वॉर्डनिहाय पाच जणांची समिती नेमून करणार उपाययोजना;माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांची माहिती
*💫मालवण दि.१२-:* मालवण शहर आणि परिसरात कोरोना रुग्णाची संख्या प्रचंड वाढत असून कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे संपुर्ण मालवण शहर कोरोनाच्या विळख्यात सापडल्यात जमा आहे. कोरोना चाचणीकडे दुर्लक्ष केल्याने दुर्दैवाने अनेकांचा मृत्यू होत आहे. राज्यकर्त्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन उपाययोजना करणे गरजेचे असून भाजपच्यावतीने मालवण शहरात प्रत्येक वार्डनिहाय्य पाच जणांची समिती नेमुन जे कोरोना रुग्ण आहेत त्यांना औषधोपचार करण्याच्या दृष्टीने मोहीम राबवून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जाणीव पूर्वक प्रयत्न करणार असल्याचे सांगत मालवणचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक सुदेश आचरेकर यांनी मालवण आणि कुंभारमाठ येथील दोन्ही कोव्हीड सेंटरला राज्यकर्त्यांनी व्हेंटिलेटरची सुविधा पुरवावी अशी आग्रही मागणी केली आहे मालवणातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आज मालवणचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी नगरसेवक श्री. दीपक पाटकर,ममता वराडकर, आप्पा लुडबे, आबा हडकर, राजू बिडये, मोहन वराडकर, आदी व इतर उपस्थित होते. श्री आचरेकर यांनी मालवणात कोरोनामुळे नागरिकांत घबराटीचे वातावरण पसरले आहे. परंतु नागरिकांनी घाबरून न जाता ताप, सर्दी खोकला सारखी लक्षणे आढळून आल्यास तातडीने शासकीय अथवा खाजगी डॉक्टरकडे जाऊन कोरोनाची चाचणी करून घ्यावी जेणेकरून कोरोनाची लक्षणे दिसल्यास त्या रुग्णावर उपचार करणे सुलभ होईल व कोरोना रुग्ण संख्येलाही आळा बसेल. कोरोनाचे रुग्ण बरे होतात त्यामुळे नागरिकांनी अफवांना बळी पडू नये अथवा घाबरून जाऊ नये असे आवाहन करून त्यांनी म्हटले आहे की, मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात कोरोनावर मुंबलक प्रमाणात औषध साठा आहे. तसेच ऑक्सिजन सिलिंडर आहेत. मात्र कमतरता आहे ती व्हेंटिलेटरची. त्यामुळे मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध नसल्याने भाजप नेते, खासदार नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, पालकमंत्री, आमदार, खासदार, जिल्हाधिकारी यांनी या ठिकाणी व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करून द्यावी त्याचप्रमाणे टेक्निशियनही उपलब्ध करून द्यावा अशी आपली मागणी आहे यावेळी श्री आचरेकर म्हणाले, मालवण शहर आणि परिसरात सापडत असलेल्या कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आपल्या बरोबर नगरसेवक दीपक पाटकर, दत्ता सामंत यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत. कोरोना रुग्णांना आता प्रबोधन करण्याची वेळ आली त्यामुळे मालवण शहरात कोरोना रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी भाजपचे नगरसेवक प्रत्येक वॉर्ड निहाय काम करणार असून प्रत्येक वॉर्डात पाच जणाची समिती असणार आहे. ही समिती कोरोना चाचणी विषयी नागरिकात प्रबोधन करतानाच कोरोना रुग्णाला औषधे पुरविण्यासाठी सहकार्य करणार आहे. मालवणातील नागरिकांनी या कामी लोकांनी आपली अडचण असल्यास सुदेश आचरेकर (९४२२३९४१८५), दीपक पाटकर (९४२२५८४०७३), ममता वराडकर (८२०८४५४९७५), आप्पा लुडबे (९४२२५८४७८८), जगदीश गावकर (९४२३३०२४४७), मोहन वराडकर (९४२२५८६२६०), चंदू आचरेकर (९४०४९२४६२९), राजू बिडये (९४२२३९२६२८), आबा हडकर (९४२०४२७२२६), महेश सारंग (९४०४९४४४४५), बाळा मालवणकर (९४२३८८०९९१), वसंत गावकर (९८६०७१९७३४) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे
