जिवावर बेतणाऱ्या केमिकलयुक्त दारूचा मालवणात सुळसुळाट

दारू पिल्याने अनेकजण आजारी कारवाई करण्याची जिल्हा विदेशी मध्य विक्रेता संघाचे अध्यक्ष शेखर गाड यांची मागणी

*💫मालवण दि.१२-:* जिवावर बेतणाऱ्या केमिकालयुक्त दारूचा मालवणात सुळसुळाट झाला आहे. ही दारू पिल्याने अनेकजण आजारी पडत आहेत. काहींचे मृत्यू झाले आहेत. तरी याप्रश्नी प्रशासनाने, संबंधित विभागाने तात्काळ लक्ष देत कारवाई करावी. अशी मागणी जिल्हा विदेशी मद्य विक्रेता संघ, सिंधुदुर्ग अध्यक्ष शेखर गाड यांनी केली आहे. लॉकडाऊन काळात मालवणात बार, देशी दारू व्यवसाय पूर्ण बंद होता. त्या वेळी गोव्यातील बॉस ७७ व अन्य काजू दारू अनधिकृत पद्धतीने मोठ्या प्रमाणात आली व विक्री झाली. गेल्या महिन्याभरात, मालवणात काही मृत्यू झालेत त्यापैकी काही मृत्यू या केमिकलयुक्त दारूमुळे झाल्याची शक्यता आहे. मालवण तालुक्यात किनारपट्टी भागत विक्री होणाऱ्या यातीलच केमिकल दारू पिऊन कित्येक लोक आजारी पडले. पायाला सूज आलेले आहेत, काहींचे मृत्यू झालेत. तरी याची प्रशासनाने दखल घेऊन त्वरित बंदोबस्त करावा. अन्यथा अधिक जिवीतहानीची शक्यता जिल्ह्याच्या अन्य भागातही आहे. शासकीय हॉस्पिटलमध्ये पण अश्या आजरानंतर उपचार घेत असलेल्या मृत्यूची चौकशी करावी. त्यातही केमिकालयुक्त दारू हे कारण पुढे येईल. तरी लवकरच यावर एकत्र येऊन ठोस निर्णय घेतला पाहिजे. राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलीस व अन्न भेसळ प्रशासनानेही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अशी मागणी जिल्हा विदेशी मद्य विक्रेता संघ, सिंधुदुर्ग अध्यक्ष शेखर गाड यांनी प्रसिद्धी पत्राच्या माध्यमातून केली आहे.

You cannot copy content of this page