राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडले दारूचे घबाड

बांदा येथे केली कारवाई मुंबई दहिसर येथील दोघे ताब्यात

*💫बांदा दि.१२-:* बेकायदेशीररित्या गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क पथकाने बांदा येथे धडक कारवाई करत मुंबई दहिसर येथील दोघांना आज ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून तब्बल १० लाख ९ हजाराच्या दारूसह ६ लाखाची गाडी मिळून एकूण १६ लाख ९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बालाजी भागवत केदार (३७) व रकिसन राजाराम दिवटेवाड (४४), अशी संशयितांची नावे आहेत. मुंबई – गोवा महामार्गावर बांदा बसस्टँडसमोरील खालसा पंजाबी ढाब्यासमोर ही कारवाई करण्यात आली. दारु वाहतुकीसाठी वापरलेला टेम्पो (एमएच ०८ डीके १८६७) ताब्यात घेण्यात आला. ही कारवाई जिल्हा अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी याच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली सब इन्स्पेक्टर डी. एम. वायदंडे, जवान आर. डी. ठाकूर, डी. आर. वायदंडे, चालक आर. एस. शिंदे यांच्या पथकाने केली. पुढील तपास सब इन्स्पेक्टर डी. एम. वायदंडे करीत आहेत.

You cannot copy content of this page