Headlines

सध्याच्या स्तर ४ मधील लागू निर्बंधांना २१ जूनपर्यंत मुदतवाढ

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचा आदेश

*💫सिंधुदुर्गनगरी, दि.१२-:* जिल्ह्यासाठी स्तर-4 चे निर्बंध लागू केलेले आहेत. शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यासाठी निर्बंधांना १४ जून सकाळी ७ वाजल्यापासून २१ जून सकाळी ७ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज दिला. शासनाकडील १० जूनच्या आदेशानुसार साप्ताहिक पाॕझीटिव्हिटी रेट व आॕक्सीजन बेडस व्यापल्याची टक्केवारी प्रसिध्द करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये कोविड बाधीत रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट हा ११.८९ टक्के असून, ऑक्सिजन बेड्स व्यापल्याची टक्केवारी ५१.५९ टक्के इतका आहे. सद्यस्थितीत देखील सिंधुदुर्ग जिल्हा स्तर-4 मध्ये असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागू करण्यात आलेल्या आदेशास १४ जून रोजी सकाळी ७ वाजल्यापासून २१ जून रोजीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

You cannot copy content of this page