Headlines

Global Maharashtra Breaking News

सावंत फाऊंडेशन, कळसुली व रोटरी क्लब ऑफ क्विन नेकलेस यांची कोरोना लढ्यासाठी मदत

४ ऑक्सिजन काँसेंट्रेटर, २ जनरेटर, ऑक्सिजन ऑन व्हील व्हॅन लोकसेवेसाठी सज्ज *💫कणकवली दि.२६-:* सावंत फौंडेशन, कळसुली आणि रोटरी क्लब ऑफ क्विन्स नेकलेस यांच्या संयुक्त उपक्रमातून ४ ऑक्सिजन काँसेंट्रेटर २ जनरेटर आणि सोबत सुसज्ज ऑक्सिजन ऑन व्हील व्हॅन तात्पुरत्या परतीच्या स्वरूपात उपलब्ध करून दिले जाणार आहे. याचा शुभारंभ जिल्हा उप रुग्णालय कणकवली येथे डॉ. शिकलगार यांच्या…

Read Full News

एस. टी. परवानाधारकांचे शुल्क माफीसाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना साकडे

*💫कणकवली दि.२६-:* कोरोना महामारीमुळे नऊ महीन्यांची टाळेबंदी आणि उर्वरीत कालावधीतील एस. टी. ची अत्यल्प प्रवासी सेवा वाहतूकीमुळे राज्यभरातील बस स्थानकांतील आस्थापनाधारक सर्वं दुकानदार आर्थिकद्दष्या मेटाकुटीस आले आहेत. त्यांचे नऊ महीन्यांचे परवाना शुल्क (भाडे) पुर्णपणे माफ करावे आणि एस. टी. ची प्रवासी सेवा वाहतूक पुर्ववत १०० टक्के सुरू होईपर्यंंत १५ टक्केच एवढीच शुल्क आकारणी करावी यासाठीचे…

Read Full News

करूळ केगद धनगरवाडी प्रलंबित रस्त्याचा प्रश्न सोडवा

महाराष्ट्र क्रांती संघटनेची राज्यमंत्री दत्ता मामा भरनें कडे निवेदनातून मागणी *💫वैभववाडी दि.२६-:* सिंधुदुर्ग जिल्हा-वैभववाडी तालुक्यातील करूळ केगद धनगरवाडी स्वतंत्र काळाच्या आगोदर पासुन वसलेली असून अज पर्यंत तेथील गरीब धनगर समाजाच्या वाडीच्या चारी बाजूने वन विभागाची जमीन असल्याने वाडीला रस्ता मिळालेला नाही रस्त्या विना तेथील समाजाला मोठ मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. अचानक आजारी झालेली…

Read Full News

ओबीसींच्या भावनांचा उद्रेकाचा वणवा राज्यभर पसरल्यास मुख्यमंत्री जबाबदार

कुडाळ येथील भाजप आंदोलनात नीलेश राणेंचा इशारा *💫कुडाळ दि.२६-:* ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे रद्द झाले आहे. त्यामुळेच ओबीसी समाज आज रस्त्यावर उतरला आहे. ही फक्त सुरुवात आहे, समाजाच्या भावनांचा उद्रेक झाला आणि संतापाचा वणवा महाराष्ट्रभर पसरला तर त्याची जबाबदारी उद्धव ठाकरे यांची राहील, असा गंभीर इशारा भाजपचे प्रदेश चिटणीस खासदार निलेश राणे…

Read Full News

डॉ.डेनिस नाडार यांचा राज्यस्तरीय कोविड योद्धा पुरस्कार देऊन गौरव

*💫कणकवली दि.२६-:* कणकवली शहरातील परबवाडी येथील डॉ. डेनिस नाडार हे शेकडो कोरोना रुग्णांसाठी देवदूत ठरले आहेत. मागील कोरोना काळापासून आजपर्यंत त्यांनी आपले रुग्णालय बंद न ठेवता रुग्णांची शुश्रूषा सुरू ठेवली असून विशेष म्हणजे रविवारी ही त्यांनी दवाखाना सुरू ठेवत रुग्णांना दिलासा दिला आहे.यांबद्दल डॉ.डेनिस नाडार यांचा राज्यस्तरीय कोविड योद्धा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या…

Read Full News

केंद्र सरकार डाटा देत नसल्‍याने राज्‍यातील आेबीसींचे आरक्षण लटकले

केंद्राने राज्‍याला सामाजिक-आर्थिक व जाती जणगणनेची माहिती द्यावी:सुजित जाधव *💫कणकवली दि.२६-:* केंद्राने राज्‍याला सामाजिक-आर्थिक आणि जातीनिहाय सर्वेक्षणाचा डाटा दिला तर आरक्षणाची अंमलबजावणी लगेच होऊ शकते. परंतु केंद्र सरकार हा डाटा देत नसल्‍याने राज्‍यातील आेबीसींचे आरक्षण लटकले असल्‍याची माहिती शिवसेनेचे उपजिल्‍हाप्रमुख सुजित जाधव यांनी आज दिली. सुजित जाधव म्‍हणाले, सर्वोच्च न्यायालयाने इतर मागासवर्गीयांचे राजकीय आरक्षण रद्द…

Read Full News

एस. टी. तील दुकानदारांच्या भाडेमाफीचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेणार:ना.अनिल परब

टाळेबंदीत पुर्ण तर उर्वरीत कालावधीसाठी १५ टक्के शुल्क आकारणीची मागणी *💫कणकवली दि.२६-:* कोरोना महामारीच्या कालावधीत एस. टी. ची प्रवासी सेवा आठ-नऊ महीने बंद होती. उर्वरित कालावधीतही सुरु असलेली प्रवासी सेवा अत्यंल्प होती. त्यामुळे एस. टी. च्या परवानाधारक दुकानदारांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे त्यांच्या परवाना भाडे (शुल्क) माफीच्या मागणीबाबत येत्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेतला…

Read Full News

लॉकडाऊन कालावधी बेकायदेशीर दारू वाहतुकीस ठरतेय पर्वणी

प्रशासनाने अनेकवेळा लक्ष वेधुनही दुर्लक्ष;जिल्हा मद्यविक्रेता अध्यक्ष शेखर गाड यांचा आरोप *💫मालवण दि.२६-:* सध्या मालवणसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात बेकायदेशीर दारू वाहतूक, विक्री यासह केमिकल युक्त दारूचा सुळसुळाट वाढला असून याकडे उत्पादन शुल्क विभागाबरोबरच पोलीस यंत्रणेनेही याकडे दुर्लक्ष केल्याने बेकायदेशीर दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यासाठी लॉक डाऊनचा काळ ही एक जणू पर्वणी ठरल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यात उमटू लागली आहे…

Read Full News

सुर्यकांत साळगावकर यांचे निधन

*💫मालवण दि.२६-:* आचरा पिरावाडी येथील दक्षिण वाडा रापण संघाचे सदस्य असलेल्या सुर्यकांत सोनु साळगावकर वय ७४ रा पिरावाडी याचे शनिवारी वृध्दापकाळाने मुंबई येथे निधन झाले. दक्षिणवाडकर रापण संघाच्या होडीवर तांडेल (सुकानी) म्हणून ते काम पहायचे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, भावजय, तीन पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.दिनेश व कल्पेश साळगावकर यांचे ते वडील होत.

Read Full News

वैभववाडी महाविद्यालयात छ.शाहू महाराज जयंती साजरी

*💫वैभववाडी दि.२६-:* महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती कार्यक्रम कोरोना नियमांचे पालन करीन महाविद्यालय ग्रंथालयांमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्रा.डॉ.एन व्ही गवळी…

Read Full News

You cannot copy content of this page