Headlines

Global Maharashtra Breaking News

बावशी रेशनिंग प्रश्नी उपोषण अखेर सोडले

*💫कणकवली दि.२८-:* बावशी येथील जय मल्हार स्वयं.सहायत्ता महीला बचत गटाच्या रद्द केलेल्या रेशनिंग प्रस्तावाबाबत तहसिलदार आर .जे‌.पवार व जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी लेखी स्वरूपात आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले आहे. या पत्रात त्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या सुचनेनुसार उपविभागीय दंडाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व शासकीय नियम पाळून या विषयासाठी कमीटी स्थापन करण्यात येणार असून गावातील…

Read Full News

*बांदा येथील नुकसानग्रस्तांना ई-स्टोअर इंडियाचा मदतीचा हात

सिंधुदुर्ग प्रमोटर नारायण कुंभार, नारायण आसयेकर, गौरव शिर्के, रोहित कुंभार, केतन कुमार यांनी केले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप *💫बांदा,दि-२८-:* बांदा शहरात पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना ई-स्टोअर इंडियाने मदतीचा हात पुढे करत ई-स्टोअरचे सिंधुदुर्ग प्रमोटर नारायण कुंभार, नारायण आसयेकर, गौरव शिर्के, रोहित कुंभार, केतन कुमार यांच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. गेल्या चार पाच दिवसांपूर्वी बांदा शहरात…

Read Full News

केर गावात विद्युत वाहिन्यांच्या लाईन खाली आल्याने धोका

*दोडामार्ग / सुमित दळवी* दोडामार्ग तालुक्यातील केर गावात विद्युत वाहिन्यांच्या लाईन खाली आल्या आहेत.तिथून जाणाऱ्या वाहनांना त्याचा मोठा धोका आहे.एखाद्या वाहनाला त्या विद्युत लाईन स्पर्श झाल्यास मोठा अनर्थ घडू शकतो,तात्काळ संबंधित विभागाने या कडे लक्ष देत उपाययोजना करावी अशी मागणी केर ग्रामस्थांनी केली आहे

Read Full News

रेडी येथील द्विभुज गणपती मंदिरात अंगारकी संकष्ट चतुर्थी साजरी…

*💫वेंगुर्ले दि.२७-:* रेडी येथील द्विभुज गणपती मंदिरात अंगारकी संकष्ट चतुर्थी मोठ्या उत्साहात व साध्या पद्धतीत साजरी करण्यात आली.प्रसिद्ध व जागृत देवस्थान असलेल्या रेडी नागोळेवाडी येथील द्विभुज गणपती मंदिरात गेल्या वर्षीपासून कोरोना विषाणूमुळे मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. यावर्षी सुद्धा कोरोनाविषाणूचे सावट होते, परंतु आता कोरोना विषाणूची रुग्णसंख्या कमी झाल्याने आज द्विभुज गणपती मंदिर भाविकांना…

Read Full News

आमदार वैभव नाईक यांच्या आमदार फंडातून मालवण येथील दोन शाळांना संगणक संच प्रदान

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाटप *💫मालवण दि२७-:* राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार वैभव नाईक यांच्या आमदार फंडातून मालवण येथील अ शि दे टोपीवाला हायस्कुल व कन्याशाळा या दोन्ही शाळांना प्रत्येकी चार संगणक संच मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि शिवसेना तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांच्या हस्ते…

Read Full News

पडवणे येथे ऑलिव्ह रिडले कासवाला जीवदान

वनविभागाच्यावतीने देवगड समुद्रात आले सोडण्यात* *💫देवगड दि.२७-:* पडवणे बीचवरती परदेशी पर्यटक यांना जखमी अवस्थेत आढळलेल्या ऑलिव्ह रिडले कासवावर त्वरीत उपचार करुन रेस्क्यू टिमच्यामदतीने सदर कासवाला देवगड बंदर समोरील समुद्रात सुखरूपपणे वनविभागाच्यावतीने जीवनदान देण्यात आले. पडवणे बीच वर परदेशी पर्यटक जोसेफ कोबुन व थॉमस यांना जखमी ऑलिव्ह रिडले कासव आढळले त्यांनी वनविभाग अधिकारी लिमये साहेब यांना संपर्क साधला व  त्यानंतर  सर्व सूत्र हलून वनविभाग सावंतवाडी उपवनसंरक्षक यांना फोनवरून संपर्क साधला गेला व त्यानंतर कणकवली वनविभागाचे वनक्षेत्रपाल घुणकीकर यांनी घटनास्थळी पडवणे येथे भेट दिली. त्याचवेळी महाड – चिपळूण येथे रेस्क्यू ऑपरेशन साठी आलेल्या पुणे येथील रेस्क्यू टिम आपले काम आटोपून कोल्हापूरला जाण्यासाठी निघालेली होती. सदर  टिम ही ॲनिमल रेस्क्यू  चॅरिटेबल ट्रस्ट ची पुणे बावधन येथील  एक रेस्क्यू टिम होती. त्यांनी पडवणे येथे जाऊन जखमी ऑलिव्ह रिडले कासवावर त्वरीत उपचार केले. या कासवाचा पुढील एक डावा पाय नव्हता व मागील उजवा पाय देखील कट झाला होता. तसेच डोळ्याला  छोटीशी जखम झाली होती. या ॲनिमल रेस्क्यू टिम मध्ये तुहिन सातारकर , डॉ.निकिता मेहता , विश्वेश महाजन, हर्षद नागवे ,निखिल  पाटील, नरेश चांडक यांचा समावेश होता.त्यांच्यासोबत  कणकवली देवगड क्षेत्राचे वनपाल  मुळे सर होते . त्यांनी सदर कासव व्यवस्थित झाल्यावर  तारामुंबरी येथील बीच वर सोडण्याचा प्रयत्न केला.परंतू  रेस्क्यू टिम ला देवगड येथे फायबर पात उपलब्ध झाल्याने सदर कासव नौका मालक ललितेश खडपकर यांच्या फायबरच्या पातीने देवगड बंदर समोरील समुद्रात सुखरूप पणे सोडण्यात आले. यावेळी सदर टिमला ललितेश खडपकर,अवि खडपकर, रुपेश कुबडे यांनी तर तारामुंबरी येथील भैरवनाथ बचत गटाच्या महिला प्रियांका तारी , प्रियांका खवळे तसेच कासव मित्र अक्षय खवळे ,दिपक खवळे व हितेश खवळे आणि तारामुंबरी  कांदळवन समिती सदस्य लक्ष्मण तारी यांनी सर्वतोपरी सहाय्य केले. यावेळी तारामुंबरी कांदळवन प्रकल्प समन्वयक  योगिता शेरे या देखील उपस्थित

Read Full News

सावंतवाडी आगारातून पुणे, तुळजापूर, कोल्हापूर, रत्नागिरी बस सेवा सुरु

आगार प्रमुख वैभव पडोळे यांची माहिती* *💫सावंतवाडी दि.२७-:* सावंतवाडी आगारातून आजपासून पुणे, तुळजापूर, कोल्हापूर, रत्नागिरी मार्गांवरील बस सेवा सुरु करण्यात आल्या आहेत, अशी महिती आगार प्रमुख वैभव पडोळे यांनी दिली.. सायंकाळी ६.४५ वाजता सावंतवाडी-पुणे निगडी (आंबोलीमार्गे) (शिवशाही), सकाळी ७.१५ वाजता सावंतवाडी-पुणे निगडी (आंबोलीमार्गे), सकाळी ९ वाजता सावंतवाडी-तुळजापूर (आंबोलीमार्गे), दुपारी १२.३० वाजता सावंतवाडी-कोल्हापूर (आंबोलीमार्गे), सकाळी ७…

Read Full News

वक्तृत्व व कथाकथन स्पर्धेत नील बांदेकरचे राज्यस्तरीय सुयश

*💫बांदा दि.२७-:* सध्याच्या लाॅकडाऊनच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी ग्रोइंग डाॅटस असोसिएशन यांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्राची गौरवगाथा या विषयाशी निगडित कोणत्याही कलेचे सादरीकरण करावयाच्या स्पर्धेत बांदा नं. १ केंद्रशाळेतील इयत्ता तिसरी मध्ये शिकत असलेल्या नील नितीन बांदेकर याने महाराष्ट्रातील शिवकालीन ऐतिहासिक प्रसंग अतिशय उत्कृष्टरित्या सादर करुन संपूर्ण महाराष्ट्रातून तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.त्याला रोख…

Read Full News

कणकवली नगरपंचायतीच्या कारभार्‍यांना आगामी निवडणुकीच घराचा रस्ता दाखवा

कणकवली शहरात शिवसंपर्क अभियान शुभारंभप्रसंगी संदेश पारकर यांचे आवाहन *💫कणकवली दि२७-:* कणकवली नगरपंचायतीच्या कारभार्‍यांना आगामी निवडणुकीच घराचा रस्ता दाखविण्याचा निर्धार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील शिवसैनिकांनी करावा. तसेच सत्तेचा गैरवापर करून कारभार्‍यांनी केलेल्या गैरव्यवहारांची माहिती शिवसैनिकांनी जनतेपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन शिवसेना नेते संदेश पारकर यांनी केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या…

Read Full News

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिवसेनेकडून मत्स्य अधिकाऱ्यांचा सत्कार

*💫मालवण दि.२७-:* राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवणात शिवसेनेतर्फे मत्स्य व्यवसाय कार्यालयातील सहाय्यक आयुक्त रवींद्र मालवणकर, सहायक मत्स्य विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर, श्रुतिका गावडे, आश्लेषा गोळवणकर यांचा सत्कार करण्यात आला. तौक्ते वादळात नुकसान ग्रस्त झालेल्या मच्छीमारांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मत्स्य अधिकाऱ्यांनी पंचनामे करण्या बरोबरच इतर सहकार्य केले. म्हणूनच आज मच्छीमारांना…

Read Full News

You cannot copy content of this page