Headlines

Global Maharashtra Breaking News

जिल्ह्यात आज आणखी ८४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.११-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४६ हजार ३०१ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २,हजार १० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ८४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

आम. नितेश राणे यांनी स्वतःच्या पक्षातील सचिन वाझे शोधावेत

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचा टोला *⚡कणकवली ता.११-:* आमदार नितेश राणे यांचा दुसर्‍यावर आरोप करणे हा धंदा असल्याचे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी सांगत नितेश राणे यांनी प्रथम स्वतःचे घर आणि कार्यकर्ते सांभाळावे दुसऱ्यावर आरोप करू नयेत. कारण 2019 मध्ये मी शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळी माझ्या अनुभवा प्रमाणे कोणताही नवा -जुना असा कोणताही…

Read Full News

पंतप्रधान मुद्रा अर्थसहाय्य योजना सहानुभूतीपूर्वक राबविली पाहिजे

याबाबत जाणीव करण्यासाठी १८ रोजी जिल्ह्यात कार्यक्रम; अँड प्रसाद करंदीकर यांची माहिती *⚡देवगड दि.११-:* सद्यस्थितीतील सर्व सामान्य जनतेची तसेच व्यावसायिकांची परिस्थिती पाहता त्यांना शासनाच्या धोरणाप्रमाणे अर्थसहाय्य करण्याची नितांत आवश्यकता आहे. कोरोना नंतरच्या पार्श्वभूमीवर अडचणीत आलेल्या बेरोजगार तरुणांना तसेच व्यावसायीकांना आर्थिक हातभार लावण्याची गरज निर्माण झालेली आहे. या वस्तुस्थितीचे अवलोकन केले असता पंतप्रधान मुद्रा अर्थसहाय्य योजनेची…

Read Full News

झाराप पत्रादेवी आयशर आणि डंपरमध्ये धडक

थांबलेल्या डंपरला दिली धडक;चालक गंभीर *⚡सावंतवाडी ता.११-:* झाराप पत्रादेवी महामार्गावर नेमळे येथे आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आयशर कंटेनरने समोरील डंपरला जोरदार धडक दिली. यात आयशर कंटेनर ड्रायव्हरला गंभीर दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी सावंतवाडी येते पाठवले आहे. दरम्यान अपघातात कंटेनरच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावेळी घटनास्थळी महामार्ग पोलीस एपीआय अरुण जाधव, हवालदार…

Read Full News

शिक्षक सक्षमीकरण व समस्यांचे निवारण करण्यासाठी “टीचर टॉक” ऍपचे लोकार्पण

एस. आर. दळवी (आय) फाऊंडेशनचा उपक्रम *⚡कणकवली ता.११-:* आता शिक्षकांना आपल्या समस्यांचे निवारण करतानाच एकमेकांमध्ये संवाद साधने आता अगदी सोप्पे जाणार आहे. महाराष्ट्रातील शिक्षण समुदायाच्या सक्षमीकरणासाठी एस. आर. दळवी (आय) फाऊंडेशनचे सहसंस्थापक रामचंद्र दळवी यांनी या टीचर टॉक या ऍपचे नुकतेच लोकार्पण केले आहे. हे ऍप शिक्षकांच्या कार्यक्षेत्राची संधी तर वाढवेलच त्यासोबत शिक्षक समुदायाच्या उन्नतीसाठीही…

Read Full News

कथक विशारद पूर्ण परिक्षेत गौरी कामत, मानसी मसुरकरचे सुयश

*⚡कणकवली ता.११-:* नुपूर कला मंदिर या कथक नृत्य वर्गाच्या गौरी कामत व मानसी मसुरकर दोन विद्यार्थिनी कथक विशारद पूर्ण या परिक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहे. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातर्फे घेण्यात येणार्‍या कथक नृत्यमधील प्रारंभिक परिक्षा या दोघींनी 2011 साली दिली होती. त्यानंतरचा त्यांचा कथक नृत्याचा प्रवास यशस्वी होण्यासाठी त्यांनी नृत्यसाधना केली. कोविडकालावधीमध्ये परिक्षा आणि…

Read Full News

ताबा सुटल्याने सावंतवाडी-कणकवली एसटी रस्त्याच्या बाजूला कलंडली

प्रवासांना सुदैवाने कोणतीही इजा नाही *⚡कुडाळ ता.११-:* कुडाळ पंचायत समिती नजीक सावंतवाडीहून कणकवलीला मार्गस्थ होणारे एसटी बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या साईडला कलंडली व अपघात झाला मात्र या बसमधून प्रवास करत असलेल्या प्रवासांना सुदैवाने कोणतेही इजा झाली नाही. गेल्या बुधवारी या ठिकाणी कणकवलीहून सावंतवाडी येथे येणारी एसटी बस कलंडली होती. या ठिकाणी अपघात होण्याची ही…

Read Full News

ठाकर समाजाने आपली संस्कृती जपावी:पद्मश्री परशुराम गंगावणे

आशिये-ठाकरवाडी येथे समाजमंदिराचे लोकार्पण *⚡कणकवली दि.११-:* सिंधुदुर्गातील ठाकर समाजबांंधवांनी आपली संस्कृती जपली पाहिजे. तसेच समाज बांधवांनी एकसंध राहून समाजाला पुढे नेले पाहिजे. लोककला ही ठाकर समाजाची संस्कृती असून राधानृत्याचे महत्त्व प्रत्येक समाज बांधवाने समजून घ्यावे, असे आवाहन पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी केले. जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आशिये-ठाकरवाडी येथे महापुरुष मित्रमंडळाने उभारलेल्या समाज मंदिराचे लोकार्पण…

Read Full News

गणेशोत्सव काळात कोकणवासीयांसाठी एसटीच्या जादा फेऱ्या कमी तिकीट दरात सोडा

संदेश पारकर यांनी परिवहनमंत्री ना.अनिल परब यांचे वेधले लक्ष *⚡कणकवली दि.११-:* गणेशोत्सव काळात कोकणवासीयांसाठी एसटीच्या जादा फेऱ्या कमी तिकीट दरात सोडण्यात याव्यात तसेच सिंधुदुर्ग एसटी विभागातील विविध मागण्या व समस्या सोडविण्यात याव्यात.महापुरामुळे कोकणातील रस्त्यांची खूपच दुरावस्था झाली आहे . त्यामुळे प्रवाश्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चांगल्या सुस्थितीत असलेल्या गाड्या पाठवाव्यात अशी मागणी कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष…

Read Full News

सातोळी बावळट येथे अवैद्य दारू वाहतुकीवर कारवाई

*⚡सावंतवाडी ता.११-:* अवैध रित्या दारू वाहतूक करणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी अटक केली आहे. सातोळी बावळाट येथील तपासणी नाक्यावर पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. संबंधित युवकां कडून २५ हजाराची मोटरसायकल आणि २१ हजाराची दारू असा एकूण ४६ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Read Full News

You cannot copy content of this page