Headlines

Global Maharashtra Breaking News

ट्रक चालकाला मारहाण ;पैसेही लांबविले

कासार्डे -आनंदनगर येथे इसमावर केला गुन्हा दाखल *⚡कणकवली ता.१२-:* रस्त्यावरील दुचाकी बाजूला घ्यायला सांगितल्याच्या रागातून एका व्यक्तीने ट्रक चालकाला शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना कासार्डे-आनंदनगर येथे घडली आहे. तसेच ट्रकच्या केबीनची  काच फोडून  १८,७०० रुपयेही लंपास करण्यात आले आहेत. ही घटना बुधवारी रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. ट्रक चालकाच्या तक्रारीवरून एकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल…

Read Full News

महाड येथील इसमाने दाखविले धारदार हत्यार

नागरिकांत खळबळ:पोलिसांत घेतली धाव *⚡सावंतवाडी ता.१२-:* शहरातील बाजारपेठेत महाड येथील एका इसमाने आपल्या पिशवीतील केशकर्तनालयातील धारदार हत्यार दाखवली. यामुळे त्या परिसरातील नागरिक भयभीत झाले होते, त्यानंतर नागरिकांनी पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली असता पोलीस घटनास्थळी दाखल होत. त्या इसमाला ताब्यात घेतले. ती व्यक्ती वेडसर असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तर त्याला चौकशी करून मूळ गावी रेल्वेतून…

Read Full News

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख ३ रस्त्यांच्या दर्जोन्नतीबाबत प्रस्ताव मागविले

आ. वैभव नाईक यांच्या मागणीची सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी घेतली दखल* *⚡कुडाळ ता.१२-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर जिल्हा मार्ग म्हणून नमूद केलेले प्रमुख ३ रस्ते जिल्ह्यांतर्गत अत्यंत महत्वाचे असल्याने सदर रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती देण्याची मागणी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे निवदेनाद्वारे केली आहे. यामध्ये…

Read Full News

मंडळ कृषी अधिकारी यांना नेमून दिलेल्या मंडळ मुख्यालयातच कामकाज करण्याचा निर्णय

कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी आ.वैभव नाईक यांची मागणी केली मान्य *⚡मालवण ता.१२-:* मालवण तालुका कृषी अधिकारी यांच्या अंतर्गत मालवण, आचरा, पोईप असे तीन मंडळ कृषी अधिकारी व कुडाळ तालुका कृषी अधिकारी यांच्या अंतर्गत कुडाळ, कडावल, माणगाव असे तीन मंडळ कृषी अधिकारी यांना नेमून दिलेल्या मंडळ मुख्यालयातच ते कार्यरत रहावेत अशा मागणीचे निवेदन कुडाळ मालवणचे…

Read Full News

प्लास्टिक राष्ट्रध्वज, तिरंगा मास्कवर बंदी घाला

*हिंदू जनजागृती समितीतर्फे वेंगुर्ला तहसिलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी *⚡वेंगुर्ला दि.१२-:* स्वातंत्र्यदिना निमित्त राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, सन्मान राखला जावा. याबाबत आवश्यक ती खबरदारी घ्यावी. दुकानांवर विक्री होणारे कागदी व प्लास्टिकचे राष्ट्रध्वज तसेच तिरंगाच्या रंगातील मास्क यावर बंदी घालावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आज गुरुवारी वेंगुर्ला तहसिलदार प्रवीण लोकरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे….

Read Full News

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे ऑगस्ट महिन्याचे मासिक वेतन चतुर्थीपूर्वी मिळावे

संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल राणे व सचिव गजानन नानचे यांनी वेधले लक्ष *⚡वेंगुर्ले ता.१२-:* माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे ऑगस्ट महिन्याचे मासिक वेतन चतुर्थीपूर्वी मिळावे अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे शिक्षणाधिकारी यांचेकडे करण्यात आल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल राणे जिल्हा सचिव गजानन…

Read Full News

चौके बावखोलहून आंबेरीमार्गे धामापूरला जाणाऱ्या रस्त्याची अवघ्या तीन वर्षात दुर्दशा

रस्त्याची ग्रामीण रस्ते विकास विभागाने दुरुस्ती करावी;सरपंच सौ. साक्षी कांबळी *⚡मालवण दि.१२-:* चौके बावखोलहून आंबेरी मार्गे धामापूरला जाणाऱ्या ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजने’तील साडे सहा कि.मी.च्या रस्त्याची अवघ्या तीन वर्षात दुर्दशा होऊन पुर्णतः चाळण झाली आहे. यामुळे वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत असून काही ठिकाणी रस्त्याला खचला असून वाहतुकीस हा मार्ग पुर्णतः धोकादायक बनला आहे. त्यामुळे…

Read Full News

गितेश गावडेच्या कुटूंबाला मदत उपलब्ध करून द्यावी

बांदा सरपंच अक्रम खान यांनी आम. नितेश राणे यांची भेट घेत केली मागणी *⚡बांदा दि.१२-:* गाळेल येथे डोंगराची माती पडून दुर्दैवी अंत झालेल्या वेंगुर्ले येथील गितेश गावडे या युवकाच्या कुटूंबाला आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी बांदा सरपंच अक्रम खान यांनी आमदार नितेश राणे यांच्याकडे केली आहे. आम.नितेश राणे यांची कणकवली येथे बांदा सरपंच…

Read Full News

…म्हणूनच आम.नितेश राणे यांच्याकडून शिवसेनेची बदनामी

विरोधी गटनेते नगरसेवक सुशांत नाईक यांचा टोला *⚡कणकवली दि.१२-:* आमदार नितेश राणे हे शिवसेनेत संभ्रम निर्माण करण्यासाठी वक्तव्य करत आहेत मात्र याचा परिणाम शिवसेनेवर होणार नाही. शिवसेना ही एकसंघ असून जिल्हा बँक निवडणूक ही सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी लढणार असून आम.नितेश राणे यांच्या पायाखालची वाळू सरकल्या मुळेच ते शिवसेनेची बदनामी करीत असल्याची टीका…

Read Full News

नांदगाव परीसरातील विज बिलअभावी विज खंडित करु नये;

शिवसेनेची मागणी *⚡कणकवली दि.१२-:* कणकवली तालुक्यातील नांदगाव परीसरातील विज बिल अभावी विज पुरवठा खंडित करण्यात येवू नये तसेच विज बिल हप्त्यात घेणेत यावे अशी मागणी नांदगाव शिवसेना शाखा प्रमुख राजा म्हसकर व शिवसेना पदाधिकारी यांनी विद्युत अभियंता विज वितरण कंपनी नांदगाव यांच्याकडे केली आहे. सध्या कोरोना पाश्र्वभूमीवर सामान्य नागरिक पूर्ण मेटाकुटीला आला आहे . तेव्हा…

Read Full News

You cannot copy content of this page