वेंगुर्लेत 10 दिवसांचा जनता कर्फ्यू : तहसील कार्यालयातील मिटींग मध्ये निर्णय

*6 ते 15 मे कालावधी : विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची होणार आरटीपीसीआर टेस्ट

*वेंगुर्ला: प्रतिनिधी* आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत मंगळवारी वेंगुर्ला येथील तहसीलदार कार्यालयात झालेल्या मिटींग मध्ये वेंगुर्लेत 6 ते 15 मे असे एकूण 10 दिवस जनता कर्फ्यू बाबत निर्णय घेण्यात आला आहे. दिवसेंदिवस वाढत्या कोरोना संक्रमणामुळे वेंगुर्लेत 6 ते 15 मे जनता कर्फ्यू होणार आहे. दूध विक्री फक्त सकाळी 6 ते 9 पर्यत सुरू राहून इतर सर्व आस्थापने बंद रहातील. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची आरटीपीसीआर टेस्ट होणार आहे. सध्या आंबा हंगाम असल्याने आंबा काढणी, विक्री, वाहातुकीस मुभा असल्याचे त्यांनी सांगितले. लोकांनी दोन दिवसात अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करावी. या मिटींगला नगराध्यक्ष दिलीप गिरप, विभागिय पोलीस अधिकारी, प्रांत सुशांत खांडेकर, तहसीलदार प्रविण लोकरे, गट विकास अधिकारी उमा पाटील, मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर- सामंत, डॉ. अतुल मुळे, तालुक्यातील काही निवडक सरपंच, सर्व पक्षाचे तालुका प्रमुख, व्यापारी आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page