Headlines

Global Maharashtra Breaking News

दहावी-बारावीतील गुणवंत मराठा विद्यार्थ्यांचा होणार सन्मान…

७० टक्क्यांवरील विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, तर ९० टक्क्यांवरील विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार; नाव नोंदणीचे आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.२५-: दरवर्षी प्रमाणे यावर्षीही दहावि बाराविच्या परिक्षेत मराठा समाजाच्या मुलांना ७०टक्केच्याव वर एकूण गुण मिळाले असतील अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन तर ज्या मुलांना ९० टक्के च्या वर गुण मिळाले असतील अशा मुलांचा शाल श्रीफळ सन्मानपत्र व…

Read Full News

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे दोडामार्ग येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार…

⚡दोडामार्ग ता.२५-:अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने रविवार, २४ मे रोजी दोडामार्ग येथे आयोजित करण्यात आलेला भव्य गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून तालुक्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.दोडामार्ग तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमधील एकूण ६५ गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ…

Read Full News

कणकवली बाजारपेठेत मध्यरात्री भीषण आग

महाडिक लेडीज टेलर दुकान जळून खाक:नागरिकांच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली.. कणकवली : शहरातील बाजारपेठेत रविवारी मध्यरात्री १२ वा. च्या सुमारास नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या घराशेजारी असलेल्या महाडिक लेडीज टेलर या दुकानाला अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीची माहिती मिळताच स्थानिक युवक आणि नागरिकांनी तातडीने घटनास्थळी…

Read Full News

तुळसचा ऐतिहासिक श्री देव जैतीर “कवळास उत्सव ” उद्या…

⚡वेंगुर्ला ता.२४-: संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसिद्धीस पावलेल्या सिंधुदुर्गतील वेंगुर्ला तालुक्यातील तुळस गावचे ग्रामदैवत असलेल्या नराचा नारायण म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देव जैतीर या जागृत देवस्थानचा “कवळास उत्सव ” सोमवारी 25 मे रोजी संपन्न होणार आहे. 16 मे रोजी ऐतिहासिक जैतीर उत्सवापासून या प्रसिद्ध धार्मिक उत्सवाची सुरुवात झाली असून सोमवारी सायंकाळी या ऐतिहासिक उत्सवाची ‘कवळास’ उत्सवाने…

Read Full News

शिरोडा येथे “केवळ दैव बलवत्तर अन पिता पुत्र बचावले”….

⚡वेंगुर्ला ता.२४-: वेंगुर्ला तालुक्यात रविवारी 24 मे रोजी पहाटे 4 वा.च्या सुमारास अचानक आलेल्या वादळीवाऱ्याने शिरोडा – केरवाडी येथून समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेली मच्छिमारी बोट खोल समुद्रात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. यात शिरोडा केरवाडी येथील राजन राघोबा सारंग (48) हे बेपत्ता झाले आहेत.प्रशासनामार्फत त्यांचा शोध सुरु आहे. तर होडीमालक प्रकाश राघोबा सारंग (60)व त्यांचा मुलगा…

Read Full News

मिठमुंबरी बागवाडी समुद्रकिनारी दुर्दैवी घटना…

पोहण्यासाठी उतरलेल्या युवकांपैकी एक बेपत्ता; तिघांना स्थानिकांनी दिले जीवदान:सुट्टी एन्जॉय करण्यासाठी मुंबईहून आलेल्या मित्रांवर काळाचा घाला.. ⚡देवगड ता.२४-:देवगड तालुक्यातील मिठमुंबरी बागवाडी समुद्रकिनारी रविवारी सायंकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत पोहण्यासाठी समुद्रात उतरलेल्या पाच युवकांपैकी एक युवक बुडाला असून तिघांना स्थानिक मच्छिमारांनी धाडसाने वाचविले. चैतन्य राजेंद्र गुरव (२२, मुळ रा. दादर-नायगाव) असे बेपत्ता झालेल्या युवकाचे नाव आहे. तर…

Read Full News

जिल्ह्यातील तिन्ही मतदार संघात ‘विशेष सखोल पुन:रीक्षण’ यंत्रणा राबवणार…

काँग्रेस जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर.. ⚡मालवण ता.२४-:भारतीय निवडणूक आयोगाकडून मतदार याद्या अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी सुरू असलेल्या ‘विशेष सखोल पुन:रीक्षण’ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथील टिळक भवनमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने महत्त्वपूर्ण बैठक व चर्चासत्र आयोजित घेण्यात आले. या बैठकीस राज्यातील नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष यांना बोलावण्यात आले होते. या बैठकीत मतदार यादी पुनर्रनिरीक्षण प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या विविध प्रश्नांवर…

Read Full News

पर्यावरण जनजागृती सायकल यात्रेचे मालवणात स्वागत…

मानव जातीच्या भवितव्यासाठी पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे – नितीन वाळके. मालवण ता.२४-:सिंधुदुर्ग राष्ट्रसेवा दल यांच्या वतीने जिल्ह्यात काढण्यात आलेल्या पर्यावरण जनजागृती सायकल यात्रेचे मालवणात आगमन झाले. आचरा, रेवंडी, कोळंब व मालवण शहर येथे या सायकल रॅलीचे स्वागत होऊन स्थानिकांनी रॅलीत सहभाग दर्शविला. कोकणचे हिरवगार सौंदर्य आबाधित राखायचे असेल तर आपल्या पर्यावरणाचे रक्षण आपणच केले पाहिजे….

Read Full News

देशाला महासत्ता बनविण्यासाठी भाजपाशिवाय पर्याय नाही…

पालकमंत्री नितेश राणे :भाजपा सिंधुदुर्ग आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान कार्यशाळेस भेट.. ⚡मालवण ता.२४-:भाजपा हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष असून, हिंदुत्वाचा विचार देशभर प्रभावीपणे पोहोचविण्याचे कार्य भाजपाने केले आहे. देशाला महासत्ता बनवायचे असेल, तर हिंदुत्वाचा विचार अधिक व्यापकपणे रुजविण्यासाठी भाजपाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी चौके वाघवणे येथे बोलताना…

Read Full News

थार गाडीने स्टंटबाजी केल्यानंतर पर्यटक तरुणाची समुद्रात उडी..?

⚡मालवण ता.२४-:मालवण दांडी येथील दांडेश्वर समुद्र किनारी थार गाडीने स्टंटबाजी करणाऱ्या एका पर्यटक तरुणाच्या स्टंटबाजीत गाडीची धडक बसण्यापासून एक स्थानिक युवती थोडक्यात बचावली. मात्र जाब विचारण्यासाठी युवतीने त्या थार चालकाचा पाठलाग केल्यावर त्याने गाडी पद्मगडच्या दिशेने नेऊन पद्मगड किनारी गाडी लावून थेट समुद्रात उडी घेतल्याचा धक्कादायक प्रकार आज दुपारी घडला. यावेळी स्थानिकांनी तातडीने पोलिसांना पाचारण…

Read Full News

You cannot copy content of this page