Headlines

Global Maharashtra Breaking News

महाशिबीरास लोकांची उपस्थिती ही न्यायदानावर असलेला विश्वास दर्शविते

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जे. भारुका ⚡सिंधुदुर्गनगरी ता.११-: राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्फत महाशिबीराचे आयोजित करण्यात आले. लोकांनी या महाशिबीरास लावलेली उपस्थिती ही न्यायदानावर असलेला विश्वास दर्शविते असे उद्गार, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जे. भारुका यांनी काढले. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा विधी…

Read More

पाचव्या संशयिताचा अटकपूर्व जामीन फेटाळला

मालवण येथील अंतोन आल्मेडा मृत्यू प्रकरण ओरोस ता.११-: रेवतळे येथील खलाशी अंतोन सालू आल्मेडा मृत्यूप्रकरणी पसार असलेल्या अमित कामनाथ कोयंडे (५५) रा मालवण यांचा अटकपूर्व जामीन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस जे भारुका यांनी फेटाळून लावला. अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील नितीन कोंघे यांनी सरकारी पक्षाच्यावतीने काम पाहिले.मासेमारीस गेल्यावर समुद्रात बेपत्ता होऊन नंतर निवती समुद्रात…

Read More

गावराई रस्त्यावरील ओव्हरलोड वाहतूक थांबवा

अन्यथा आंदोलन;ग्रामस्थांचे प्रशासनाला निवेदन सिंधुदुर्गनगरी ता ११मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून नव्याने करण्यात आलेल्या गावराई येथील रस्त्याची ओव्हरलोड चिरे वाहतुकीमुळे दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून भरधाव चालणाऱ्या या वाहतुकीमुळे शालेय मुले व नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून होणाऱ्या ओव्हरलोड वाहतुकीवर प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा गावराई ग्रामस्थांनी…

Read More

शिवचरित्र मनामनात पोहोचविण्यासाठी सहकार्य करणार

खा अमोल कोल्हे यांची श्री स्वराज्य प्रतिष्ठानला आश्वासन बांदा/प्रतिनिधीछत्रपती शिवाजी महाराज यांचा कार्यकर्तृत्वचा इतिहास तळागाळात पोहोचविण्याचे काम आपण श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून करत आहात हे कौतुकास्पद असून ही काळाची नितांत गरज आहे. भविष्यात श्री शिवशंभू प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने शिवविचार प्रत्येकाच्या मनामनात पोहचविण्याचे पवित्र कार्य करण्यासाठी आपण निश्चितच आपल्याला सहकार्य करू असे आश्वासन खासदार तथा अभिनेते…

Read More

मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम सुरू

८ डिसेंबर पर्यंत मुदत वेंगुर्ले     निवडणुक आयोगाने १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित राज्यातील सर्व विधानसभा मतदार संघाच्या मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर केला आहे. या कार्यक्रमातंर्गत ९ नोव्हेंबर पासून ८ डिसेंबर पर्यंत दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहेत. या कालावधीत मतदार नोंदणी अनुषंगाने विशेष मोहिमा राबविण्याचे आयोगाने निर्देश दिले आहेत….

Read More

आडेली सोमेश्वर जत्रोत्सव १३ रोजी

⚡वेंगुर्ला ता.११-: आडेली येथील श्रीदेव सोमेश्वराचा वार्षिक जत्रौत्सव रविवार दि. १३ नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे. यानिमित्त धार्मिक विधी, रात्रौ पालखी व त्यानंतर कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ (कै.सुधीर कलिगण) यांचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. तरी भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Read More

वेतोरे सातेरी जत्रोत्सव १३ रोजी

⚡वेंगुर्ला ता.११-: वेतोरे येथील प्रसिद्ध श्री देवी सातेरीचा जत्रौत्सव रविवार दि. १३ नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्त सकाळपासूनच देवीची ओटी भरणे, रात्रौ तरंगदेवतांसहित देवीची पालखी प्रदक्षिणा, त्यानंतर खानोलकर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक होणार आहे. भाविकांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन देवस्थानतर्फे केले आहे.

Read More

वेंगुर्ला येथे हिदू हितचितक अभियानाचा शुभारंभ

⚡वेंगुर्ला ता.११-: संपूर्ण देशभर विश्व हिदू परिषदेने ६ ते २० नोव्हेंबर या कालावधीत ‘हिदू हितचितक अभियान‘ आयोजित केले आहे. वेंगुर्ल्यामध्येही या अभियानाचा शुभारंभ १० नोव्हेंबर रोजी येथील चांदेरकर विठ्ठल मंदिरात ह.भ.प.सावळाराम कुर्ले बुवांच्या हस्ते करण्यात आला. विश्व हिंदू परिषदेचे जिल्ह्याचे सामाजिक समरसतेचे प्रमुख विष्णू खोबरेकर यांनी हितचिंतक अभियानाची माहिती दिली. तसेच सर्व हिंदूंनी एकत्रित येण्याची…

Read More

६१ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची सिंधुदुर्ग जिल्हा फेरी मालवणमध्ये

१५ ते १९ नोव्हेंबर आयोजन मालवण (प्रतिनिधी) राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची सिंधुदुर्गची प्राथमिक फेरी मालवण केंद्रावर दि. १५ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे रोज सायंकाळी ७ वाजता स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. मालवण नाट्यगृह स्पर्धेसाठी सज्ज झाले आहे. स्पर्धेचे…

Read More

विभाग नियंत्रक प्रशांत वासकर यांचे एसटी कामगार सेनेने केले स्वागत

⚡कणकवली ता.११-: सिंधुदुर्ग जिल्हा एसटी कामगार सेनेच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा नुतन परिवहन विभागीय नियंत्रक प्रशांत वासकर यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी सिंधुदुर्ग परिवहन विभागातील कामगारांच्या समस्या श्री.वासकर यांच्याकडे मांडण्यात आल्या. एसटी कामगार असतील किंवा अधिकारी या सर्वांना विश्वासात घेवुनच सिंधुदुर्ग परिवहन विभाग अधिक सक्षम करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी श्री.वासकर यांनी उपस्थितांना दिले.यावेळी सिंधुदुर्ग युवासेना माजी…

Read More
You cannot copy content of this page