⚡सावंतवाडी ता.०४- : पोलिस खात्यात हवालदार, जमादार,पोलीस उपनिरीक्षक, पोलीस निरक्षक या पदावर सिंधुदुर्ग, रायगड, आणि रत्नागिरी या ठिकाणी सेवा बजावून २००९ साली निवृत्त झालेले वसंत बाबू जाधव (वय ६८) यांचे शनिवारी रात्री अल्पशा आजाराने कुडाळ येथे खासगी रुग्णालयात उपचार घेताना निधन झाले.
गेल्या काही वर्षांपासून त्यांना कर्करोगासारख्या असाध्य आजाराने ग्रासले. वयाच्या ६८व्या वर्षी त्यांनी शनिवारी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, एक मुलगी, जावई , नातवंडे असा मोठा परिवार आहे. कलंबिस्त इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक अभिजित जाधव तसेच प्राथमिक शिक्षिका सौ.साक्षी संगम – कदम यांचे ते वडील होत. तर तळेबाजार हायस्कूलच्या सहाय्यक शिक्षिका मृण्मयी जाधव यांचे ते सासरे होत. रविवारी सकाळी ११.३० वाजता त्यांच्यावर मुळगाव चौकुळ ता. सावंतवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आलेत.
