Global Maharashtra Breaking News

साळशी कुवळे मार्गावर एसटी- क्वालिसमध्ये अपघात ; २० जण जखमी

⚡कणकवली ता.०७-: देवगड तालुक्यातील साळशी – कुवळे मार्गावर एसटी महामंडळाची देवगड रेंबवली एसटी बस (एम.एच. १४ बी.टी १५७८) व क्वालिस कार (एम.एच.०४ – बी.वाय २५९६) ही साळशी ते शिरगांव जात असताना २ वाहनांमध्ये दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात एस.टीतील सुमारे १० प्रवासी तर क्वालिस मधील १० प्रवासी मिळून २० प्रवासी जखमी…

Read More

जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत कासार्डेतील खेळाडुंचे वर्चस्व

⚡कणकवली ता.०७-: महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन व बृहन महाराष्ट्र योग प्रसाद यांच्या संयुक्त विद्यमाने ओरोस येथील छ.शिवाजी महाराज कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात घेण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा योगासने स्पोर्ट्स चॅम्पियनशिप स्पर्धेत कासार्डे येथील योगा खेळाडूंनी सर्वच गटात वर्चस्व गाजवले आहे.उद्घाटन प्रसंगी कासार्डेच्या हर्ष घाडीगावकर व वेंगुर्लेची कु.मारिया अल्मेडा यांनी सादर केलेल्या योगासनांच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली.याप्रसंगी व्यासपीठावर…

Read More

सात दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप

⚡बांदा ता.०७-: गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या… अशा जयघोषात तर फटाक्यांच्या आतषबाजीत सात दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. पावसाने घेतलेली विश्रांती अन लहानांपासून थोरांपर्यंत असलेली भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती.

Read More

स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्ट कणकवलीतर्फे १८ रोजी दूध पदार्थ प्रशिक्षण

⚡कणकवली ता.०७-: स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्ट कणकवलीच्या माध्यमातून रविवार १८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते सायं. ४ पर्यंत भवानी सभागृह, भवानी मंदिर, तेली आळी, मनसे कार्यालयाशेजारी, कणकवली येथेदूध पदार्थ प्रशिक्षण आयोजित केले आहे. तज्ज्ञ प्रशिक्षक स्वयंसिद्धा कोल्हापूर हे प्रशिक्षण देणार आहेत.यावेळी मलई बर्फी,दूध कोल्ड्रींक्स, बासुदी, मलई पेढा, गुलाबजाम, मोजरेला चीज, रसगुले, लस्सी, पनीर इत्यादी प्रशिक्षण दिले…

Read More

कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांनी अशोक सावंत यांचा केला सत्कार

चतुर्थी पूर्वी वेतन मिळवून दिल्याने व्यक्त केली कृतज्ञता ⚡कुडाळ ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज कंत्राटी कामगारांची गणेश चतुर्थी आनंददायी जावी यासाठी त्यांना गणेश चतुर्थीपूर्वी वेतन मिळावे यासाठी सिंधुदुर्ग वीज कंत्राटी कामगार संघटनेचे अध्यक्ष अशोक सावंत यांनी विशेष प्रयत्न करून वेतन मिळवून दिले. यासाठी संघटनेच्या वतीने त्यांच्या घरी जात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार…

Read More

विद्यार्थी कला केंद्र,मुंबई आयोजित राज्यस्तरीय वेशभूषा स्पर्धेत नील बांदेकर प्रथम

⚡बांदा ता.०७-: मुंबई येथील,विद्यार्थी कला केंद्र मुंबई संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वेशभूषा स्पर्धेत बांदा केंद्र शाळेचा,इयत्ता चौथी मध्ये शिकणारा विद्यार्थी कु.नील नितीन बांदेकर याने संपूर्ण राज्यातून प्रथम क्रमांकाचा बहुमान पटकावला.यामध्ये त्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांची वेशभूषा साकारली होती .नीलने आतापर्यंत ११० स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकाविली आहेत.त्याच्या या यशात बांदा केंद्र शाळेतील समस्त शिक्षक वृंद मुख्याध्यापक तसेच…

Read More

परप्रांतीय पर्ससीन ट्रॉलरवर “शीतल” चा लक्ष

समुद्रातील घुसखोरी रोखण्यासाठी गस्ती नौका तैनाद मालवण दि प्रतिनिधीमत्स्य विभागाच्या वेळ काढू धोरणाचा फायदा उठवीत गेले दोन महिने सिंधुदुर्गचा समुद्र आपल्याला आंदण मिळाल्यागत परराज्यातील पर्ससीन टॉलर्सनी घुसखोरी करीत समुद्रातील मासळी ओरबाडून नेण्याचे सत्र सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर अखेरीस मत्स्य विभागाची शीतल नावाची गस्ती नौका मालवणच्या समुद्रात तैनात करण्यात आली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा दोन महिन्याच्या…

Read More

अनधिकृत जलक्रीडा व्यावसायिकांवरील कारवाईला पोलीस पुरविणार बळ

उपविभागीय पोलीस अधिकारी कांबळे यांचे आश्वासन;बंदर निरीक्षक उमेश महाडिक यांची माहिती मालवण दि प्रतिनिधीमत्स्य विभागाच्या वेळ काढू धोरणाचा फायदा उठवीत गेले दोन महिने सिंधुदुर्गचा समुद्र आपल्याला आंदण मिळाल्यागत परराज्यातील पर्ससीन टॉलर्सनी घुसखोरी करीत समुद्रातील मासळी ओरबाडून नेण्याचे सत्र सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर अखेरीस मत्स्य विभागाची शीतल नावाची गस्ती नौका मालवणच्या समुद्रात तैनात करण्यात आली आहे. ऑगस्ट…

Read More

माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी घेतले भाजप युवा कार्यकर्ता विश्वनाथ गोसावी यांच्या गणपतीचे दर्शन

⚡सावंतवाडी ता.०७सहदेव राऊळ- : माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा प्रवक्ते सच्चीदानंद उर्फ संजू परब यांनी मळगाव येथील भाजपचे युवा कार्यकर्ते विश्वनाथ गोसावी यांच्या निवासस्थानी भेट देत गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत माजी आरोग्य सभापती आनंद नेवगी तसेच हेमनाथ गोसावी, भिकनाथ उर्फ बाब्या गोसावी उपस्थित होते.

Read More

सिंधुदुर्गात ५५ हजार तर सावंतवाडीत १३ हजार शेतकऱ्यांची केवायसी बाकी

आजचा शेवटचा दिवस : 25 रोजी जमा होणार हप्ता : केवायसी करण्याचे सावंतवाडी तहसीलदारांचे आवाहन ⚡बांदा ता.०७-: पीएम किसानच्या लाभार्थ्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अद्यापही 55 हजार 164 शेतकऱ्यांनी तर सावंतवाडी तालुक्यातील 13 हजार 440 शेतकऱ्यांनी अद्यापही केवायसी केलेली नाही. जर दि.7 सप्टेंबरपर्यंत केवायसी न केल्यास 25 सप्टेंबर रोजी जमा होणारा किसान सन्मान योजनेचा हप्ता संबंधित शेतकऱ्यांना…

Read More
You cannot copy content of this page