“स्मरण साखळी” पुस्तकाचे १५ रोजी प्रकाशन

शिवसेना विस्तार इतिहासाची या पुस्तकात मांडणी;जेष्ठ पत्रकार अण्णा केसरकर यांची माहिती

सावंतवाडी ता.१३-: कोकणात शिवसेना कशाप्रकारे उभी राहिली, शिवसेनेत मी कसा संघर्ष केला, गावा गावात कशा प्रकारे शिवसेना वाढत गेली, याची माहिती देणारे ” स्मरण साखळी” नावाच्या पुस्तकाचे १५ नोव्हेंबर रोजी प्रकाशन होत असल्याची माहिती ज्येष्ठ शिवसैनिक अण्णा केसरकर यांनी दिली आहे.

सावंतवाडी पत्रकार संघ आणि अण्णा केसरकर मित्रमंडळ यांच्या माध्यमातून येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या सभागृहात सावंतवाडी संस्थानचे राजे खेमसावंत भोसले व माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांच्या उपस्थितीत होणार आहे. तरी हे पुस्तक युवकांनी वाचावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले आहे.

You cannot copy content of this page