दोडामार्ग शहराच्या विकासासाठी भाजप पक्ष, नेते कधी कमी पडणार नाहीत

भाजप युवा नेते विशाल परब यांचा विश्वास;नगराध्यक्ष चेतन चव्हाण आयोजित दीपावली शो टाईमचे परब यांच्याहस्ते उद्घाटन

⚡दोडामार्ग ता.१३-: दोडामार्ग शहराच्या विकासासाठी आणि निधी देण्यासाठी माझे नेते, माझा पक्ष आणि मी कधीही कमी पडणार नाही.भविष्यात या भागासाठी कोट्यावधीचा निधी येईल आणि दोडामार्ग हे राज्यातील नंबर वन शहर बनेल. यात कोणतीही शंका नाही.यासाठी दोडामार्ग वासियांनी आज जशी चेतन चव्हाण च्या पाठीशी उभे राहून एकजुट दाखवली तीच एकजूट तुम्ही शहराच्या विकासासाठी दाखवाल. असा मला विश्वास आहे.दोडामार्ग शहराने मला भरपूर काही दिलं. येथील जनतेशी व लोकांशी माझे ऋणानुबंध जुळलेले आहेत. त्यामुळे जीवनात मी दोडामार्गवासियांचे ऋण मी कधीच विसरू शकत नाही. त्यासाठीच आपण चेतन चव्हाण यांना या भव्य दिव्य शो चे आयोजन करण्यासाठी गणेश चतुर्थीलाच सांगितले होत. चेतन चव्हाण हे अस व्यक्तिमत्व आहे की त्याच्या पाठीशी उभे राहून दोडामार्ग शहराचा सर्वांगीण विकास करून घ्या. असे भावनिक आवाहन विशाल परब यांनी केले.

दोडामार्गच्या ऐतिहासिक ‘दीपावली शो टाईम’चे शानदार उदघाटन युवा उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते झाले.

यावेळी उद्घाटन प्रसंगी विशाल परत बोलत होते नगराध्यक्ष चेतन चव्हाण हे यावेळी उपस्थित होते. उद्योजक तथा विशाल सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थिती हे उद्घाटन मोठ्या दिमाखात झाले.वक्रतुंड मित्रमंडळ बाजारपेठेत दोडामार्ग यांनी हे आयोजन केल होत.यंदा हे १५ वे वर्ष आहे.यावेळेस विशाल परब यांच दोडामार्गात जल्लोषी स्वागत करण्यात आले.विशाल परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून दोडामार्ग आयडॉल कार्यक्रमास प्रारंभ झाला. मनोज पार्सेकर यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, युवा उद्योजक दत्ताराम उर्फ बाबा टोपले, उद्योजक विवेकानंद नाईक, उपनगराध्यक्ष देविदास गवस, बांधकाम सभापती नितीन मणेरीकर, शिक्षण व आरोग्य सभापती गौरी पार्सेकर, महिला व बालकल्याण सभापती ज्योती जाधव, लक्ष्मण नाईक, गणपत देसाई, डॉ. अनिषा दळवी, नितीन मणेरीकर, गौरी पार्सेकर, ज्योती जाधव, क्रांती जाधव, सुकन्या पनवेलकर, स्वराली गवस, रामचंद्र मणेरीकर, पांडुरंग बोर्डेकर, संजय खडपकर, राजेंद्र निंबाळकर, संजना म्हावळणकर, वासंती मयेकर, चंदन गांवकर, मनोज, मंडळाचे अध्यक्ष मनोज पार्सेकर, प्रकाश सावंत, राजेश फुलारी, विशाल मणेरीकर, समीर रेडकर आदि उपस्थित होते.

You cannot copy content of this page