Global Maharashtra Breaking News

उत्कर्ष मंडळ मुंबई (टेंबवाडी) तर्फे गणेश चतुर्थीचे औचित्य साधून शैक्षणिक साहित्य वाटप

⚡बांदा ता.०८- : उत्कर्ष मंडळ मुंबई(टेंबवाडी) आयोजित विलवडे नं.२ शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गणेश चतुर्थीची आैचित्य साधून दरवर्षी प्रमाणे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.यामध्ये वह्या,स्कूल बॅग,कंपास, वॉटरबॅग, पेनड्राईव्ह शाळेला संगणक संच,साउंडसिस्टिम आदी साहित्याचे वाटप करण्यात आले.माजी उपसभापती कृष्णा सावंत तर बांदा केंद्र प्रमुख संदीप गवस, मंडळाचे अध्यक्ष अरुण सावंत यांच्या उपस्थित सर्व वि्दयार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप…

Read More

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन १२ व १३ सप्टेंबर रोजी

⚡वेंगुर्ला ता.०८-: जिल्हा परिषद सिधुदुर्ग व वेंगुर्ला पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्यावतीने ४९वे वेंगुर्ला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन १२ व १३ सप्टेंबर या कालावधीत वेंगुर्ला येथील मदर तेरेसा स्कूल येथे आयोजित करण्यात आलेले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन १२ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वाजता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते व गटविकास अधिकारी विद्याधर सुतार यांच्या…

Read More

तळवडे येथील कात उद्योजक उत्तम आचरेकर यांचे निधन

⚡सावंतवाडी ता.०८- : तळवडे गावचे सामाजिक कार्यकर्ते व कात उद्योजक तथा आचरेकर कॉप्लेक्सचे मालक उत्तम उर्फ हरि अर्जुन आचरेकर (८१) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले . त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन मुली ,नातवंडे, असा परिवार आहे.

Read More

चांदणी स्वरुपातील मखर लक्षवेधी

⚡वेंगुर्ला ता.०८-: गणेश चतुर्थीला गणपतीसमोर श्रीसत्यनारायण महापूजा आयोजित केली जाते. या पूजेसाठी लागणारी मखर हा एक आकर्षणाचा विषय असतो. तुळस काजरमळी येथे पुंडलिक विठ्ठल परब यांच्या घरी श्री सत्यनारायणाच्या पूजेसाठी चांदणी स्वरूपात बनविलेले मखर लक्षवेधी ठरत आहे. हे मखर रोहित परब, राहुल परब, स्वपनिल परब, तुषार परब, दत्तात्रय परब यांनी बनविले आहे.

Read More

मालवणात १०३ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई

⚡मालवण ता.०८-: ऑगस्ट महिन्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी मालवणातील १०३ वाहनचालकांना ७४ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. मालवण शहरात ट्रीपल सीट वाहन चालविणे, लायसन्स नसणे, नंबर प्लेट नसणे, नंबर प्लेट तुटलेली असणे, नो पार्किंग एरियात दुचाकी व चारचाकी लावणे, हेल्मेट नसणे, आरसी बूक, पीयूसी नसणे आदी प्रकरणी वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

Read More

मालवणात वीजबिल तक्रार शिबिरात ५३ वीज ग्राहकांच्या तक्रारी प्राप्त

⚡मालवण ता.०८-: राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत नागरिकांना वाढीव वीजबिल देण्यात येत असल्याने कॉंग्रेसने देऊळवाडा येथील वीज वितरण कार्यालय येथे वाढीव वीजबिल तक्रार शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात ५३ वीज ग्राहकांच्या तक्रारी आल्या आहेत. या तक्रारी वीज अधिकाऱ्यांकडे देण्यात येणार असून त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे पदाधिकारी अरविंद मोंडकर यांनी दिली. यावेळी…

Read More

कणकवली बाजारपेठ येथील
गुरुनाथ अंधारी यांचे निधन

⚡कणकवली ता.०८-:कणकवली बाजारपेठ येथीलरहिवासी तथा प्रतिष्ठित व्यापारी गुरुनाथ उर्फ नाथा दत्तात्रय अंधारी (७९) यांचे अल्पशाचा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुन, नात, सहा विवाहित मुली,जावई,नातवंडे असा मोठा परिवार आहे.आदर्श नॉव्हेल्टिचे मालक चेतन अंधारी यांचे ते वडिल होत.बाजरपेठेत गुरुनाथ हे पान, सुपारी, नारळ विक्रीचा व्यावसाय करीत होते.नाथा या नावाने ते सर्वांना परिचित होते. शहरातील…

Read More

कळसुली येथील मीना
मदन राणे यांचे निधन

⚡कणकवली ता.०८-:कणकवली तालक्यातील कळसुली येथील रहिवासी सौ. मीना मदन राणे (वय ६५ वर्षे )यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.अतिशय मनमिळाऊ स्वभावाच्या मीना राणे यांच्या जाण्याने कळसुली गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पती मुलगा, सून नात, दिर भावजय व सासू असा परिवार आहे कळसुली हायस्कुलचे सहाय्यक शिक्षक चेतन मदन राणे यांच्या त्या मातोश्री होत.

Read More

सुधारित विकास योजनाची बैठक तात्काळ का?

मनसे करणार जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार;परशुराम उपरकर यांचा इशारा ⚡कणकवली ता.०८- : कणकवली शहराची सुधारित विकास योजना तयार करण्यासाठी गुरुवारी आयोजित केलेली बैठक अयोग्य आहे. वास्तविक किमान सात दिवसाची मुदत देऊन बैठक लावण्याची गरज होती. मात्र तसे न करण्यात आल्याने नागरिकांना आवाहन करून मुदत देऊन ही बैठक पुन्हा आयोजित करणे आवश्यक आहे. मुख्याधिकाऱ्यांनी त्या दृष्टीने कार्यवाही करून…

Read More

विविध रुपातील 10 बाप्पांची रेखाटली चित्रे

वारगाव येथील चिमुकल्या बहीण भावाने दाखविली कला ⚡कणकवली ता.०८-:कणकवली तालुक्यातील वारगाव येथील कैवल्य हेमंत मेस्त्री आणि कृष्णा सुर्यकांत पांचाळ या चिमुकल्या बहीण भावाने गणेशोत्सव काळात अगदी सहज सोप्या विविध रुपातील 10 बाप्पांची चित्रे रेखाटली आहेत. चित्रकलेची आवड असणाऱ्या या चिमुरड्या कलावंत बहीण भावाने बाप्पाप्रती असलेली भक्ती कलेमधुन व्यक्त केली.  मुळ वारगाव येथील व सध्या मुंबई…

Read More
You cannot copy content of this page