Headlines

वेंगुर्ला नगरपरिषद मार्फत स्वच्छता अभियान प्रभावीपणे…

⚡वेंगुर्ला ता.०४-: वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी श्री गणेश चतुर्थी सणाच्या अनुषंगाने दिलेल्या सुचनानुसार स्वच्छता कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत.वेंगुर्ला सावंतवाडी मुख्य मार्गांनजीक, भटवाडी, हॉस्पिटल नाका ते कॅम्प परिसर तसेच अन्य भागात ग्रास कटिंग जलदपणे करण्यात आले आहे. वेंगुर्ला बाजारपेठेतील स्वच्छतेच्या दृष्टीने, तसेच मुख्य स्वच्छतागृहे स्वच्छ राखली जात असून याबाबत नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. श्री गणेश चतुर्थी सण अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपल्याने वेंगुर्ला नगरपरिषदेने शहर अधिक स्वच्छ रहावे या दृष्टीने गटार स्वच्छतेचे काम, ग्रास कटिंग प्रभावीपणे करण्यात येत आहे. वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी गेल्या दोन-तीन दिवसात संबंधित ठिकाणी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना शहर अधिक स्वच्छ राखण्याच्या सूचना दिल्या आहेत. नगरपरिषद प्रशासनामार्फत मोकाट जनावरांना डायरेक्ट गोशाळेत स्थलांतरित करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे काही ठिकाणी संबंधित जनावरांच्या मालकांची धावपळ उडाली आहे.

You cannot copy content of this page