पिण्याच्या पाण्याची होणार रासायनिक तपासणी-:प्रशासक प्रजित नायर
ओरोस ता.१५-: जलजीवन मिशन च्या माध्यमातुन 55 लिटर शुध्द व शाश्वत पाणी देण्याकरीता जिल्हा परिषद कठिबध्द आहे. शुध्द व स्वच्छ पिण्याचे पाणी देणे हि आपली जबाबदारी असुन जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन जिल्ह्यातील सर्व 5656 पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची एकाचवेळी जैविक तपासणी करण्यात आली होती. त्याच प्रमाणे जिल्ह्यातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची रासायनिक तपासणी करण्यात येणार आहे. असे…
