ओरोस ता.१५-:
बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे
गीता नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत
पंडीत वामनराव काराणे संगीत विद्यालयाचा शुभारंभ करण्यात आला.
प्रारंभी वैष्णवी लाड यानी या संगीत विद्यालयाची माहिती दिली. इतर उपक्रमा प्रमाणेच हाही उपक्रम यशस्वी करण्याचा मानस त्यानी व्यक्त केला. दीपक भोगटे यानी पंडीत वामनराव काराणे यानी वयाच्या ८५ वर्षा पर्यंत अत्यंत अल्प मोबदल्यात अनेक विद्यार्थ्याना संगीताचे शिक्षण दिले. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या विद्यालयाला काराणे यांचे नाव दिल्याचे सांगितले. तसेच या विद्यालयाला सर्वतोपरी साहाय्य करण्याचे आवाहन केले.
अर्जून पेंडूरकर यानी आजचा दिवस आमच्या आयुष्यातील आनंदाचा दिवस असून काराणे सरांच्या नावाच्या विद्यालयात काम करणे म्हणजे भाग्यच समजतो, असे प्रतिपादन केले. यामुळे अनेक वर्षांची इच्छा पूर्ण झाल्या बद्दल सेवांगणास धन्यवाद दिले. कार्यक्रमाच्या शेवटी रवीना पांजरी हिने “मुरलीधर श्यामसुंदर, पद्मनाभा नारायणा, वृंदावनी खेळू ” या गायनाने कार्यक्रमाची सांगता केली. या संगीत विद्यालयात अर्जून पेंडूरकर यांच्या नेतृत्वाखाली अर्जून पेंडूरकर तबला, रवीना पांजरी गायन आणि प्रतिक कोतिवडेकर हामोनियम शिकवणार आहेत.
यावेळी किशोर शिरोडकर, बापू तळावडेकर, सुनील गुराम, दीपक भोगटे, वैष्णवी लाड, गीता नाईक, प्रियांका भोगटे, भगवान काळसेकर, सुजाता पावसकर, श्रीधर गोंधळी, श्री चव्हाण तसेच शिवण क्लास च्या विद्यार्थीनी उपस्थित होते.
