जीवनात भाषेवर प्रभुत्व महत्वाचे-: सायली चव्हाण

ओरोस ता.१५-:

सर्वप्रथम स्वत:ला व्यक्त करायला शिका, कोणताही न्यूनगंड बाळगू नका. कोणत्याही एका भाषेवर प्रभुत्व मिळवा मग ती आपली मालवणी भाषा असली तरी चालेल तीच भाषा अस्खलित बोला. मुलांना करिअरविषयी मार्गदर्शन करण्याची आपली इच्छा आहे आणि सेवांगण मार्फत आपण ती करू असे प्रतिपादन सायली चव्हाण यांनी नाथ पै सेवांगण कट्टा येथे बोलताना केले.
प्रा मधु दंडवते यांच्या 17 व्या पुण्यतिथी स्मृतीप्रित्यर्थ बॅ. नाथ पै सेवांगण, शाखा-कट्टा येथे
प्रा. मधु दंडवते सेवानिधी वाटप व इतर बऱ्याच स्पर्धांची पारितोषिक वितरण असा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यावेळी सायली चव्हाण बोलत होत्या. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून चित्रकार हरेष चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बॅ. नाथ पै सेवांगण मालवणचे कार्याध्यक्ष दीपक भोगटे यांनी केले. यावेळी बोलत असताना गेली 17 वर्षे हा प्रा. मधु दंडवते सेवानिधी वाटप कार्यक्रम राबविला जातो. गरीब होतकरु मुलांना सहकार्य केले जाते, असे सांगतानाच बॅ. नाथ पै सेवांगण शाखा-कट्टा याठिकाणी राबविलेले अनेक उपक्रम पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, भातुकली बनविणे, फुलदाणी बनविणे यांसारख्या स्पर्धा तसेच मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या श्रीमती प्रतिभा हल्याळकर यांनी पाठविलेल्या जवळपास दिडशे स्वेटर-टोपी-विजार वाटप याही कार्यक्रमाची माहिती दिली. यावेळी त्यांनी प्रा. मधु दंडवते यांचा 81 वर्षाचा जीवनप्रवास त्यांनी थोडक्या शब्दांत मांडला.

You cannot copy content of this page