मळगाव येथे होणाऱ्या बैठकीला नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना उपस्थित राहण्याचे आवाहन
⚡सावंतवाडी ता.१५-: आगामी होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या भाजपची नियोजन करिता सावंतवाडी मळगाव येथे भगवती मंगल कार्यालय येथे महत्त्वाची बैठक सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत आयोजित करण्यात आली आहे.
ही बैठक भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांच्या उपस्थितीत होणार असून यावेळी ते सर्वांना मार्गदर्शन देखील करणार आहेत.
तरी या बैठकीला भाजपचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन भाजप शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, बांदा मंडळ अध्यक्ष महेश धुरी, आंबोली मंडळ अध्यक्ष रवी मडगावकर यांनी केल आहे.
