माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलफ : अशा माणसांमुळेच देशाची एकात्मता आणि अखंडता अबाधित राखण्यात मदत
⚡सावंतवाडी ता.१५-: वसंत उर्फ अण्णा केसरकर यांच्यासारखी माणसे दीपस्तंबासारखे काम करीत आहेत फायद्या तोट्याचा विचार न करता समाजासाठी झटणाऱ्या अशा माणसांमुळेच देशाची एकात्मता आणि अखंडता अबाधित राखण्यात मदत झाली आहे अशा माणसामुळेच देशाची अखंडता व एकात्मता यापुढेही अबाधित राहील असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांनी येथे व्यक्त केला
यावेळी बोलताना रमाकांत खलप म्हणाले की वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी सामाजिक जडणघडणीसाठी महत्त्वपूर्ण असे काम केले. गोवा मुक्ती लढ्यासाठी त्यांनी योगदान दिले. बेळगाव तसेच परिसरातील सीमा भागातील मराठी बांधवांच्या लढ्यासाठी त्यांनी योगदान दिले. सीमा भाग महाराष्ट्रात समाविष्ट व्हावा यासाठी त्यांनी कर्नाटक पोलिसांच्या लाट्याकाट्याही खाल्ल्या अण्णा केसरकर यांनी काम करीत असताना फायद्या तोट्याचा कधीच विचार केला नाही त्यांनी दीपस्तंभ सारखे सतत काम करत राहिले त्यांच्यासारख्या कार्यकर्त्यामुळेच हा देश अखंडित आहे त्यांचे कार्य नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असेच आहे.
यावेळी माजी आमदार शंकर कांबळे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर सावंतवाडी संस्थांनचे राजे खेम सावंत भोसले राजमाता सुभदा देवी भोसले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर माजी अध्यक्ष गणेश जेटे गजानन नाईक बेळगाव महानगरपालिकेचे माजी नगरसेवक पंढरी परब प्रवीण मांजरेकर जी ए बुवा आदी उपस्थित होते
