व्हॉलीबॉल स्पर्धेत मुळदे उद्यानविद्या महाविद्यालयाला जेतेपद

दापोली उद्यानविद्या महाविद्यालयावर केली मात

⚡सावंतवाडी ता.१५-: आंतर-महाविद्यालयीन क्रिडा स्पर्धा “स्पोर्टेक्स २०२२” मध्ये उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे च्या व्हॉलीबॉल मुलींच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उद्यानविद्या महाविद्यालय, दापोली च्या संघास हरवून विजेतेपद पटकावले शरदचंद्र पवार कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय , खरवते- दहिवली येथे दि १२ व १३ नोव्हेंबर रोजी ह्या स्पर्धा पार पडल्या

उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे च्या ४८ विद्यार्थी विद्यार्थिनीं आंतर-महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा “स्पोर्टेक्स – 2022” मध्ये व्हॉलीबॉल व खो खो या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. दोन दिवस पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये दोन्ही खेळांमध्ये सहभागी स्पर्धकांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या . खो-खो या खेळ प्रकारात मुलांच्या संघाने कृषी महाविद्यालय, सांगुळवाडी सोबत अटीतटीच्या झालेल्या उपांत्य सामन्यामध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. ग्रामीण भागात वसलेल्या व कमी सुविधा उपलब्ध असलेल्या या महाविद्यालयाच्या संघाने मिळविलेले हे यश निच्छितच कौतुकास्पद आहे. मा. सहयोगी अधिष्ठाता डॉ.प्रदीप हळदवणेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी क्रीडा अधिकारी प्रा.हर्षवर्धन वाघ व डॉ.परेश पोटफोडे यांनी संघव्यवस्थापक म्हणून उत्कृष्ट काम पाहिले.

You cannot copy content of this page