⚡कणकवली ता.१५-: जांभवडे येथील सुमित चंद्रकांत मडव यांच्या नवजात बालकांवर कोल्हापूर येथे उपचार सुरु आहेत. उपचारासाठी कै. सिताराम ( आबा) सखाराम तर्फे सर स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट जांभवडे बामणवाडीच्या वतीने आर्थिक स्वरूपात मदत करण्यात आली.
सदर ट्रस्टच्या माध्यमातून अनेक शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य विषयक उपक्रम राबविले जातात. गरजूंना मदत केली जाते. श्री. रोहित मडव यांच्याकडे ट्रस्टचे सचिव , मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते वामन तर्फे यांनी आर्थिक मदत सुपुर्द
केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते ट्रस्टचे हितचिंतक अरुण सावंत, राजेंद्र सावंत, बबन नाईक उपस्थित होते. यावेळी रोहित मडव यांनी ट्रस्टचे आभार मानले.
