Headlines

Global Maharashtra Breaking News

रेकोबा व अंबाजी विद्यालयातर्फे पाककला स्पर्धा व रानभाज्या प्रदर्शन संपन्न

⚡मालवण ता.०२-: राष्ट्रीय पोषण माह अभियान २०२२ अंतर्गत ‘अम्मा की रसोई’ अंतर्गत पालकांसाठी पाककला स्पर्धा व मुलांसाठी रानभाज्या प्रदर्शनाचा उपक्रम लायन्स क्लब ऑफ मालवण च्या सहयोगाने मालवण वायरी येथील रेकोबा माध्यमिक विद्यालय व अंबाजी विद्यालय यांनी आयोजित केला होता. यावेळी दोन गटात स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी लायन्स अध्यक्ष वैशाली शंकरदास व विश्वास गावकर यांनी या…

Read More

महाराष्ट्र सरकारचा पर्यटन मित्र २०२२ पुरस्कार पर्यटन व्यावसायिक महासंघास प्राप्त

⚡मालवण ता.०२-: कोरोना महामारी नंतर गेल्या दोन वर्षात कोकणातील पर्यटन वाढीसाठीबीच टुरिझम बरोबरच हिस्ट्री , कल्चर, मेडिकल, हेरिटेज, फूड टुरिझमच्या वाढीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या कार्याची दखल राज्य शासनाने घेत यावर्षीचा पर्यटन मित्र २०२२ पुरस्कार जाहीर करून तो नुकताच वेंगुर्ला येथे प्रदान केला आहे पर्यटन व्यावसायिक महासंघ कोकणातील पर्यटन वाढीसाठी अनेक उपक्रम राबवित…

Read More

रेवंडी येथे नवरात्रोत्सवा निमित्ताने जिल्ह्यातील पहिल्या १०८ कुमारी पूजनाचा कार्यक्रम भद्रकालीच्या नामघोषात संपन्न

⚡मालवण ता.०२-: कुमारी मुलींना देवीचे रूप मानून त्यांची पूजा अर्चा करीत आणि श्री देवी भद्रकाली देवीचा जागर करीत आज मालवण तालुक्यातील रेवंडी गावची ग्रामदेवता श्री देवी भद्रकाली मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त कुमारी पूजनाचा भव्य कार्यक्रम पार पडला. यात १०८ कुमारींचे पूजन करण्यात आले. जिल्ह्यात प्रथमच आयोजित केलेल्या या कार्यक्रमास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रेवंडी येथील भद्रकाली…

Read More

रोटरी व्हीलचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते अनावरण

⚡कणकवली ता.०२-:कणकवली शहरात प्रवेश करताना शहराच्या प्रवेशद्वारावर जानवली नदीवरील पुलावर मधील दुभाजकावर कणकवली रोटरी क्लबच्यावतीने बसविलेल्या रोटरी व्हीलचे अनावरण नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते करण्यात आले रोटरी क्लब च्या माध्यमातून कणकवली शहरात विविध उपक्रम राबविले जात असताना सामाजिक ऐक्य व संघटन चा संदेश देणाऱ्या रोटरी क्लबच्या माध्यमातून या रोटरी व्हील च्या अनावरणाचा कार्यक्रम नुकताच पार…

Read More

कणकवली भाजपातर्फे महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री जयंती साजरी

⚡कणकवली ता.०२-: कणकवली तालुका भाजपाच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली.यावेळी माजी जि.प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत,जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई,भाजपा कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे,नगरसेवक शिशिर परुळेकर,भाजपा युवा मोर्चा जिल्हा संघटक संदीप मेस्त्री,भाजपा जिल्हा प्रसिध्दी प्रमुख बबलु सावंत,भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष समीर प्रभुगावकर,भाजपा युवा मोर्चा जिल्हा…

Read More

“त्या” दोन्ही रुग्ण वाहिकांचे ९ रोजी सुरेश प्रभू करणार लोकार्पण

वेंगुर्ले, प्रतिनिधी. एजीस फेडरल लाईफ इन्शुरन्स यांच्या सीएस आर निधीतून किरात ट्रस्ट  वेंगुर्ले, माझा वेंगुर्ला व अटल प्रतिष्ठान सावंतवाडी यांना देण्यात आलेल्या दोन रुग्णवाहीकांचे  लोकार्पण माझी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत 9 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पाच वाजता वेंगुर्ले कॅम्प येथील मधुसूदन कालेलकर सभागृहामध्ये करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे कोकण विभाग वैद्यकीय आघाडी प्रमुख…

Read More

नट वाचनालयात गांधी व शास्त्री जयंती साजरी

बांदा/प्रतिनिधीयेथील नट वाचनालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. वाचनालयचे अध्यक्ष एस. आर. सावंत, सेवानिवृत्त प्राध्यापक प्रकाश पाणदरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.यावेळी उपाध्यक्ष सुभाष मोर्ये, सचिव राकेश केसरकर, सहसचिव हेमंत मोर्ये, संचालक शंकर नार्वेकर, जगन्नाथ सातोसकर, निलेश मोरजकर, अंकुश माजगावकर, धोंडू फणशीकर, महिला संचालिका स्वप्नीता सावंत, ग्रंथपाल प्रमिला नाईक-मोरजकर,…

Read More

स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पश्चिम भारतात दुसरी

प्रशासक प्रजित नायर, डेप्युटी सीईओ विनायक ठाकूर यांनी स्वीकारला सन्मान ओरोस ता.०२-: स्वच्छ भारत मिशन (ग्रा) ट्प्पा 2 अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामिण 2021 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याने पश्चिम भारतात दुसरा तर राज्यात पहिला क्रमांक पटकविला आहे. विज्ञान भवन, दिल्ली येथे एका कार्यक्रमांत केंद्रिय ग्रामविकास तथा पंचायत राज मंत्री गिरिराज सिंग यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण झाले….

Read More

बांदा शहरात ४ रोजी दुर्गामाता दौड

मंगेश पाटील यांची माहिती बांदा/प्रतिनिधीबांदा शहरात मंगळवार दिनांक ४ रोजी श्री दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे ७ वाजता ही दौड येथील श्री देवी भूमिका मंदिर येथून सुरु होणार असल्याची माहिती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख मंगेश पाटील यांनी दिली.त्यांनी सांगितले की, श्री राजमाता जिजाऊनी छत्रपती श्री शिवाजी महाराज पोटात असताना नवरात्रात अखंड नऊ…

Read More

विद्यार्थ्यांना पळविण्याचा प्रकारची शहानिशा करा

पालकांची पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले यांच्याकडे मागणी बांदा/प्रतिनिधीबांदा शहरात शाळकरी विद्यार्थ्याला पाळविण्याचा प्रकार घडल्याने शहरातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी शहरातील जागृत पालकांनी आज बांदा पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले यांची भेट घेत या प्रकरणाची योग्य शहानिशा करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी पालकांच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले.यावेळी हेमंत दाभोलकर, हेमंत मोर्ये, दत्ताराम नाटेकर,…

Read More
You cannot copy content of this page