एलसीबीची कारवाई: एकाला रंगेहाथ पकडले
⚡देवगड ता.०५-: कोटकामते फडणीसवाडी येथे गोवा बनावटीची दारु विक्री करीत असताना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग सिंधुदुर्ग यांनी एकला रंगेहाथ पकडुन त्याच्या जवळील 14 हजार 900 रुपयांची गोवा बनावटीची दारु जप्त करुन मुंबई दारु बंदी अधिनियमाखाली त्यांच्या वरती 65 ई प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. सदरची कारवाई हि सोमवारी दुपारी 1 वा. सुमारास करण्यात आली.सदरचा गुन्हा हा देवगड पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला असून अधिक तपास देवगड पोलीस करीत आहेत.
