मालवण तालुका धान्य व केरोसीन संघटना अध्यक्षपदी अमित गावडे यांची बिनविरोध निवड

⚡मालवण ता.०५-: मालवण तालुक्यातील
रेशन दुकानदारांची महत्त्वपूर्ण सभा मालवण (ओझर) या ठिकाणी आज पार पडली. यावेळी मालवण तालुका धान्य व केरोसीन संघटनेच्या नवीन कार्यकारणीची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये मालवण तालुका धान्य व केरोसीन संघटना अध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी रेवंडी सर्जेकोटचे रेशन दुकानदार अमित गावडे यांच्याकडे देण्याचे सर्वानुमते ठरले तर उपाध्यक्षपदी तारकर्ली देवबागचे रेशन दुकानदार बाळकृष्ण लुडबे, सचिवपदी कट्टा येथील रेशन दुकानदार सुभाष गिरकर तर खजिनदारपदी धुरीवाडा धान्य दुकानदार विजय पेडणेकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

या सभेमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा धान्य व केरोसीन दुकानदार संघटना सल्लागार कमलाकांत(बाळू)कुबल, अजित भोगले, भाई मांजरेकर, नंदकुमार सावंत, योगेश जाधव, सुरेश बागवे, विलास धुरी, दीपक बागवे, अमित गावडे, बबन परब, दादा मांजरेकर, विशाल ढोलम, प्रशांत मलये, विजय पेडणेकर, सुभाष गिरकर, बाबु लुडबे, द्वारकानाथ पालव, रोहीत पेडणेकर, पोईप सोसायटी चेअरमन विठ्ठल नाईक यांच्यासहित असंख्य धान्य व केरोसीन दुकानदार उपस्थित होते.

You cannot copy content of this page