काँग्रेस जिल्हा सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल अरविंद मोंडकर यांचा सत्कार

⚡मालवण ता.०५-: राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल अरविंद मोंडकर यांचा मालवण तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने
माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क मंत्री, माजी गृहमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या निर्देशनानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव जिल्हा प्रभारी शशांक बावचकर व सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष इर्शादभाई शेख यांनी जिल्हा काँग्रेस बैठकीत अरविंद मोंडकर यांना जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्तीचे पत्र देऊन सत्कार केला होता. या निवडीद्वारे मोंडकर यांच्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला चांगली संधी दिल्या बद्दल व मालवण तालुका काँग्रेसचाही योग्य तो सन्मान झाल्याचे काँग्रेस तालुकाध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक मेघनाद धुरी यांनी सांगत प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण यांच्या हस्ते अरविंद मोंडकर यांचा सत्कार केला.

यावेळी काँग्रेसच्या मालवण महिला तालुकाध्यक्ष ममता तळगावकर, शहर अध्यक्षा गीता नेवाळे, युवक काँग्रेसचे योगेश्वर कुर्ले, सामाजिक कार्यकर्त्या विद्या फर्नांडिस, आबा मसुरकर आदि उपस्थित होते.

You cannot copy content of this page