सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायचा
२५ डिसेंबरला सावंतवाडीत मेळावा

⚡कणकवली ता.०५-: सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग चा दरवर्षी होणार वार्षिक जिल्हा मेळावा यावर्षी रविवार दिनांक २५ डिसेंबर २०२२ रोजी सावंतवाडीत धनश्री मंगल कार्यालय येथे होणार आहे.आज सावंतवाडी येथे जिल्हा अध्यक्ष ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर महाराज यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हा कार्यकारिणीच्या सभेत घेण्यात आला. यावर्षीचे यजमान पद सावंतवाडी तालुक्याला देण्यात आले.
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष ह.भ.प.रामचंद्र कदम,सचिव श्री राजू राणे,जिल्हा सदस्य ह.भ.प.विलास राणे, श्री.बबन सावंत, श्री. एस.के.सावंत, प्रकाश राणे, सावंतवाडी तालुका अध्यक्ष ह.भ.प.लक्षण कडवं,चोपदार मधुकर कडव, विष्णू राऊळ, प्रदीप सावरवाडकर,लक्षण सावंत,दशरथ ओटूणेकर,नाना सरमलकर,बाबू सावंत,रमेश सावंत,प्रकाश पास्टे,सुरेश तावडे,बाबू नाईक,रघुनाथ आमुलेकर व सावंतवाडी, दोडामार्ग येथील वारकरी उपस्थित होते
संतसेवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
दरवर्षी प्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग च्यावतीने जिल्ह्यातील जेष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार, मृदंगमनी यांना देण्यात येणाऱ्या मानाच्या संतसेवा पुरस्कार २०२२ साठी संबंधीत वारकरी यांनी अध्यक्ष/ सचिव सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, जिल्हा कार्यालय हळवल, ता.कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग या पत्त्यावर आपल्या माहिती व फोटो सह अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले

You cannot copy content of this page