Headlines

Global Maharashtra Breaking News

कणकवली नगर वाचनालयातर्फे २० रोजी तालुकास्तरीय वाचक स्पर्धा

⚡कणकवली ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या वाचक स्पर्धेचा कार्यक्रम निश्चित झालेला असून तालुकास्तरीय वाचक स्पर्धा कणकवली नगरवाचनालयातर्फे रविवार २० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता नगर वाचनालयाच्या सभागृहात आयोजित केलेली आहे. स्पर्धक कणकवली तालुक्यातील कोणत्याही वाचनालयाचा वाचक सदस्य असणे आवश्यक आहे. ‘मधु मंगेश कर्णिक यांची कोणतीही साहित्यकृती’ असा या वाचक स्पर्धेचा विषय…

Read More

कसाल येथे सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची सभा संपन्न

सभेत मालवण येथील जयदीप खोडके याचा संघटनेतर्फे करण्यात आला सत्कार ⚡सावंतवाडी ता.०७सहदेव राऊळ -: विहिरीत पडून बुडणाऱ्या मुलाला जीवदान देणाऱ्या मालवण येथील जयदीप खोडके याचा सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला.सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची सभा न्यू इंग्लिश हायस्कूल कसाल येथे रविवारी संपन्न झाली. या सभेत सिंधुदुर्ग…

Read More

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची आमदार नितेश राणे यांनी घेतली भेट

कोकणच्या विकासासंदर्भात चर्चा ⚡सावंतवाडी ता.०७-: भाजपचे युवा नेते आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची त्यांच्या सावंतवाडी येथील ‘सरस्वती’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.ॲड. राहुल नार्वेकर कोकण दौऱ्यावर आले असता नार्वेकर व नितेश राणे यांच्यात कोकणच्या विकासासंदर्भात विस्तृत चर्चा झाली.कोकणच्या विकासाला अधिक गती मिळण्यासाठी विधानसभा अध्यक्ष म्हणून प्रयत्नशील राहणार असा शब्द विधानसभा…

Read More

ठेकेदाराच्या बेफिकिरी पणामुळे रखडलेल्या चौकुळ चुरणीची मुस रस्त्याकडे पालकमंत्र्यांचे लक्ष द्यावे

वैभव राऊळ, बबन गावडे,अनिल चव्हाण, बुधाजी पाताडे यांची मागणी ⚡आंबोली, ता.०७-: चौकुळ चुरनीची मूस येथील रस्ता अत्यंत खराब असून मोठे मोठे खड्डे दगड आणि कच्चा रस्ता यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे.मुख्यमंत्री सडक योजनेतून हा रस्ता मंजूर असून ठेकेदाराच्या बेफिकिरी मुळे लोकांचे हाल होत आहेत याकडे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी तत्काळ…

Read More

सोनुर्ली येथे साफसफाई करत असताना लावलेल्या आगीत होरपळून वृद्ध जखमी

सावंतवाडी पोलीस ठाण्यात नोंद ⚡सावंतवाडी,ता.०६-: सोनुर्ली माऊली मंदिर परिसरात घराच्या बाजूला साफसफाई करत असताना लावलेल्या आगीत एक वृद्ध होरपळून जखमी झाले. ही घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. नारायण महादेव म्हापसेकर (६६), असे त्यांचे नाव आहे. दरम्यान त्यांना नातेवाईकांनी तात्काळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर या ठिकाणी उपचार सुरू आहेत. तर याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात…

Read More

कनयाळ राम पुरुष देवाच्या वार्षिक जत्रोत्सवात विशाल परब यांनी घेतले दर्शन

⚡वेंगुर्ले ता.०६-: कनयाळ येथील श्री देव राम पुरुष मंदिर वार्षिक जत्रोत्सवनिमित्त युवा नेते विशाल परब यांनी उपस्थित राहून श्रींचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर मानकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More

अहोरात्र मेहनत घेत उद्योगाची कास धरल्यास यश हमखास :सुनील नारकर

⚡कणकवली ता.०६-: आपल्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न होतोय ही आनंदाची बाब आहे. चर्मकार समाजातील अनेकांनी आपल्या बुद्धी आणि हुशारीच्या बळावर आपले उच्च स्थान निर्माण केले आहे. सधन झालेल्या आपल्या व्यक्तींनी आपल्या समाजातील दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांचे पालकत्व घेणे आवश्यक आहे. शिक्षणानंतर उद्योगाची कास धरताना अहोरात्र मेहनत करायची तयारी ठेवा. आयुष्यातील चढ उताराना धैर्याने सामोरे…

Read More

मालवण एसटी आगाराचे व्यवस्थापक सचेतन बोवलेकर यांच्याकडे कुडाळचा अतिरिक्त भार

राज्य परिवहन सिंधुदुर्ग विभागाच्या नियंत्रकांकडून देण्यात आले पत्र ⚡मालवण ता.०६-:मालवण एसटी आगाराचे व्यवस्थापक श्री. सचेतन बोवलेकर यांच्याकडे कुडाळ एसटी आगाराच्या व्यवस्थापक पदाचा अतिरिक्त भार सोपविण्यात आला आहे. याबाबतचे पत्र राज्य परिवहन सिंधुदुर्ग विभागाच्या नियंत्रकांकडून श्री. बोवलेकर यांना देण्यात आले आहे. सद्यस्थितीमध्ये कुडाळ एसटी आगाराचे आगार व्यवस्थापक रिक्त असून विभाग नियंत्रक कार्यालयाकडून पुढील आदेश होई पर्यंत…

Read More

गोव्या सारखे पर्यटन सिंधुदुर्गात वाढत नाही

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची खंत सावंतवाडी ता.०५-: गोव्या सारख्या ठिकाणी पर्यंटन वाढला असताना मात्र सिंधुदुर्गात हवे तसे वाढल नसल्याची खंत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज येथे व्यक्त केली. दरम्यान जो पर्यंत सुविधा वाढत नाहीत तोपर्यंत सिंधुदुर्गाचा विकास होऊ शकत नाही, असे ते यावेळी बोलताना म्हणाले. अध्यक्ष नार्वेकर खासगी दौर्‍या निमित्त सावंतवाडीत आपल्या निवासस्थानी…

Read More

लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये जिल्ह्यातील पहिली बायपास शस्त्रक्रिया यशस्वी

केंद्रीयमंत्री नारायण राणे;जिल्ह्यातील नागरिकांना परिपूर्ण आरोग्य सेवा देण्याचे स्वप्न सत्यात उतरल्याचे व्यक्त केले समाधान ओरोस ता ६सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया अमित शंकर परब (वय ४०) या रुग्णावर पडवे येथिल लाइफटाइम हॉस्पिटलमध्ये यशस्वी झाली आहे. हा क्षण जिल्ह्याच्या आणि लाईफटाईम हॉस्पिटलच्या दृष्टीने ऐतिहासिक आहे, अशी माहिती यशस्वी शस्त्रक्रियेनंतर हॉस्पिटलचे संस्थापक तथा केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम…

Read More
You cannot copy content of this page