⚡कणकवली ता.०१-: त्रिमूर्ती विकास मंडळ, मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे ता. मालवण या प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समिती अध्यक्ष उत्तम गांवकर हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक तथा रामगड सरपंच शुभम मटकर हे होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षे स्नेहसंमेलन कार्यक्रमाचा आनंद घेता आला नसल्याने मोठ्या प्रमाणावर पालक व ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी श्री सत्यनारायण महापूजा, रांगोळी स्पर्धा, पारितोषिक वितरण, हस्तलिखित प्रकाशन सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच इतरही क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करावी व त्यासाठी परिश्रम करावेत असे आपल्या मनोगतात सांगताना श्री. मटकर यांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा देण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मुख्याध्यापक वामन तर्फे यांनी शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा व विविध उपक्रमाचा आढावा घेताना संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला आणि शाळूसमोरील आवाहनाचा उल्लेख करुन उपस्थितांना सहकार्याचे आवाहन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात उत्तम गांवकर यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे उत्कृष्ट कामगिरी बद्दल कौतुक केले. तसेच उपस्थित मान्यवर, पालक, ग्रामस्थ यांच्यासमोर संस्थेच्या योजना मांडल्या. या कार्यक्रमाचे औचित्य साधूनप्रमुख पाहुणे शुभम मटकर, असरोंडी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.पाटील , शिरवंडे, असगणी, किर्लोस गावातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,संस्था नियुक्त शिक्षण सेविका श्रीमती प्रणीता गांवकर,असरोंडी हायस्कूलचे लिपिक प्रदिप सावंत, यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी असरोंडी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. पाटील , शिरवंडे सरपंच सौ. चैताली गांवकर, असगणी सरपंच सौ. साक्षी चव्हाण, किर्लोस सरपंच सौ. साक्षी संदीप चव्हाण,असगणी उपसरपंच देवेंद्र पुजारे, शालेय समिती सदस्य दिपक चव्हाण, दशरथ घाडीगांवकर, संस्थापक सदस्य चंद्रकांत गांवकर,अजित घाडीगांवकर, प्रकाश लुडबे, असगणी पोलीस पाटील आनंद तांबे, वासुदेव कासले,ॲड.लक्ष्मण बाक्रे,रघुनाथ गांवकर,प्रवीण घाडीगांवकर,रमेश गांवकर व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी माजी विद्यार्थ्यांच्यावतीने शाळेला सी सी टीव्ही बसवून देण्याचे ॲड. श्री बाक्रे यांनी जाहीर केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. काणेकर यांनी केले. ज्येष्ठ शिक्षक श्री.सावंत यांनी अहवाल वाचन केले. तर आभार प्रदर्शन श्रीम. खोत यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीमती प्रणिता गांवकर, लिपिक कैलास घाडीगांवकर, शामसुंदर गांवकर, जानू शिंदे, महेश तांबे आनंद मालणकर यांनी विशेष मेहनत घेतली.
त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडेचे स्नेहसंमेलन उत्साहात
