असलदे ग्रामस्थातर्फे सेवानिवृतीपर मुख्याध्यापक प्रमोद लोके यांचा सत्कार

⚡कणकवली ता.०१-: माध्यमिक शिक्षण शाळा कोळोशी हडपीडचे मुख्याध्यापक तथा असलदे गावचे सुपुत्र प्रमोद लोके यांचा सेवानिवृत्तीपर असलदे ग्रामस्थांच्या वतीने सरपंच चद्रकांत डामरे,सोसायटी चेअरमन,पत्रकार भगवान लोके यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कोळोशी हडपीड प्रशालेच्या पटांगणावर मुख्याध्यापक प्रमोद लोके यांचा सेवानिवृत्तीपर सोहळा पार पडला.या सत्कार प्रसंगी सोसायटी माजी चेअरमन प्रकाश परब,माजी सरपंच लक्ष्मण लोके,माजी उपसरपंच संतोष परब,सोसायटी संचालक छत्रुघ्न डामरे,प्रदीप हरमलकर,संजय डगरे
यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page