Headlines

Global Maharashtra Breaking News

संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेची 29 रोजी त्रैमासिक सभा

⚡कणकवली ता.२७-: संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेची त्रैमासिक सर्वसाधारण सभा रविवार 29 जानेवारी 2023 रोजी गोपुरी आश्रम सभागृह सकाळी ठीक 10.30 वाजता संस्थेचे राज्याध्यक्ष संजयजी कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. तसेच सर्व विभागीय पदाधिकारी आणि जिल्हा पदाधिकारी यांची राज्य कार्यकारणी सोबत संयुक्त सभा दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आली आहे.रोहिदास समाजाचे धर्मगुरू संत शिरोमणी…

Read More

कसवण गावकरवाडी येथे गणेश जयंती उत्साहात

सौ. सुप्रिया प्रविण गांवकर ठरल्या पैठणीच्या मानकरी ⚡कणकवली ता.२७-: श्री गणेश कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ कसवण गावकरवाडी आयोजित गणेश जयंती उत्सवाच्या कार्यक्रमात सकाळच्या सत्रात अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडले. गणेशपूजा, होमहवन, सत्यनारायणाची महापूजा, महाआरती , महाप्रसाद, स्थानिकांची सुश्राव्य भजने, वारकरी संप्रदायाचा हरिपाठ, वालावलकर दशावतार नाट्यप्रयोग, महिलांचे हळदीकुंकू कार्यक्रम , मुलांसाठी तरूणांसाठी जल्लोष युवाईचा यामध्ये रेकाॅर्ड…

Read More

मडुरा-बाबरवाडीत शॉर्टसर्किटमुळे काजू बागेला आग

४० कलमे जळून खाक : भरपाई देण्याची बागायतदारांची मागणी ⚡बांदा ता.२७-: मडुरा-बाबरवाडी येथील काजू बागायतदार शरद रेडकर यांच्या बागेला दुपारच्या सुमारास आग लागून 40 काजू कलमे जळाली. यात बागायतदार रेडकर यांचे सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले असून शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. बाबरवाडी येथील काजू बागायतीत दुपारच्या सुमारास अचानक धूर दिसू लागला. जवळपास काम…

Read More

व्हॉइस ऑफ मिडियाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी विजय गावकर

कार्याध्यक्ष विवेक ताम्हणकर, सरचिटणीसपदी राजन चव्हाण ⚡कणकवली ता.२७-: व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या राष्ट्रीय संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी विजय गावकर, कार्याध्यक्ष विवेक ताम्हणकर, सरचिटणीसपदी राजन चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. हंगामी अध्यक्ष विवेक ताम्हणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत सर्वानुमते या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. यावेळी जिल्हा कार्यकारणीच्या कोषाध्यक्षपदी विनोद जाधव, सहसरचिटणीसपदी श्रेयश शिंदे,…

Read More

सोनुर्ली नवयुवक कला क्रीडा मंडळाने जपले सामाजिक भान

क्रिकेट स्पर्धेतील पैशातून माऊली मतिमंद विद्यालयाला केली मदत;अन्नधान्यासह दैनंदिन वापराचे दिले साहित्य ⚡सावंतवाडी ता.२७-: सोनुर्ली येथील नवयुवक कला क्रीडा मंडळाने सामाजिक भान ठेवून यावर्षी पार पडलेल्या एस पी एल 2023 क्रिकेट स्पर्धेच्या शिल्लक रकमेतून काही वाटा बाजूला काढत आरोस दांडेली येथील माऊली मतिमंद निवासी विद्यालयाला अन्नधान्यासह दैनंदिन वापराचे साहीत्य वितरण केले. नवयुक्त लकडा मंडळ गेली…

Read More

सावंतवाडी नगरपालिका घड्याळाची टिकटिक सुरू

माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांच्या पाठपुराव्याला यश : दोन-तीन महिने बंद होते घड्याळ ⚡सावंतवाडी ता.२७-: शहरातील नगरपालिकेचे बंद असलेले घड्याळ अखेर आज सुरू झाले. त्यामुळे सावंतवाडी शहरातील नागरिकांना आता घड्याळाची टिकटिक ऐकू येणार आहे. गेले दोन-तीन महिने शहरातील घड्याळ बंद होते. याबाबत माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधून बंद घड्याळ तात्काळ सुरू…

Read More

मानवी जगण्याचं वास्तव प्रतिबिंब आपल्या कवितेत दिसावं :सरिता पवार

⚡कणकवली ता.२७-: सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,तोंडवली महाविद्यालयामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला.या निमित्ताने महविद्यालात निबंध स्पर्धा,हस्ताक्षर स्पर्धा,घोषवाक्य स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,स्वलिखित कविता वाचन स्पर्धा,वादविवाद स्पर्धा आणि अंताक्षरी यासारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.त्या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभागी होवून उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. ह्या स्पर्धेच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते. स्वलिखीत कविता वाचन…

Read More

सातोसेत आदर्शमाता पुरस्कारीत महिलेस ध्वजारोहणाचा मान

ग्रामपंचायत मध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यास दिला मान ⚡बांदा ता.२७-: सावंतवाडी तालुक्यातील सातोसेत 74व्या प्रजासत्ताक दिनी सरपंच प्रतीक्षा मांजरेकर यांनी स्वतःला मिळालेला ध्वजारोहणचा मान गावातील श्री देवी माऊली शाळा सातोसे नं.1 च्या अंगणवाडी मदतनीस तथा आदर्शमाता पुरस्कार प्राप्त तनुजा तुळशीदास गडेकर यांना दिला. तर ग्रामपंचायत मध्ये यावर्षी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचारी वैशाली विनायक मेस्त्री यांना मान दिला….

Read More

असलदे येथील होम मिनिस्टर स्पर्धेत प्रिया शेट्ये पैठणीच्या मानकरी

उपविजेत्या स्वरा डगरे,तृतीय विजेत्या मानसी डगरे ⚡कणकवली ता.२७-: असलदे उगवतीवाडी येथे ब्राम्हणदेव सेवा मंडळाच्या वतीने श्री गणेश जयंती उत्सव , श्री सत्यनारायणाची महापुजा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्त कै.सुमती विश्राम लोके यांच्या स्मरणार्थ सोसायटी चेअरमन भगवान लोके पुरस्कृत होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेत प्रिया प्रेमानंद शेटये (कसई दोडामार्ग) पैठणीच्या मानकरी ठरल्या.तर उपविजेत्या…

Read More

दारुम सरपंच, उपसरपंच, सदस्यांसह ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश

आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत झाला पक्ष प्रवेश ⚡कणकवली ता.२७-: कणकवली तालुक्यातील दारूम ग्रामपंचायत सरपंच तेजस्वी लिंगायत, उपसरपंच प्रवीण तळेकर व सदस्य अमित तळेकर,वैशाली कल्याणकर,सानिका राऊत,समृद्धी तावडे, प्रभावती चव्हाण,अशा संपूर्ण ग्रामपंचायत कार्यकारिणीने माजी सरपंच संतोष तळेकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत प्रक्ष प्रेवश केला. यावेळी माजी उपसरपंच अशोक गिरकर,माजी सदस्य किरण भोगले,ग्रामस्थ रवींद्र तळेकर, प्रमोद…

Read More
You cannot copy content of this page