कसवण गावकरवाडी येथे गणेश जयंती उत्साहात

सौ. सुप्रिया प्रविण गांवकर ठरल्या पैठणीच्या मानकरी

⚡कणकवली ता.२७-: श्री गणेश कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ कसवण गावकरवाडी आयोजित गणेश जयंती उत्सवाच्या कार्यक्रमात सकाळच्या सत्रात अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडले.


गणेशपूजा, होमहवन, सत्यनारायणाची महापूजा, महाआरती , महाप्रसाद, स्थानिकांची सुश्राव्य भजने, वारकरी संप्रदायाचा हरिपाठ, वालावलकर दशावतार नाट्यप्रयोग, महिलांचे हळदीकुंकू कार्यक्रम , मुलांसाठी तरूणांसाठी जल्लोष युवाईचा यामध्ये रेकाॅर्ड डान्स, काॅमेडी स्कीट हा बहुरंगी कार्यक्रम आणि महिलांसाठी खास श्री गणेश मानाची पैठणी खेळ पैठणीचा हा बहारदार कार्यक्रम सामाजिक कार्यकर्ते सुनिल काणेकर, वागदे यांच्या सहकार्याने घेण्यात आला. त्यांचा मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला. श्री गणेश मानाची पैठणीचा मान सौ. सुप्रिया प्रविण गांवकर यांनी पटकावला.सौ.सपना सचिन गांवकर – द्वितीय क्रमांक,सौ. प्रज्ञा ज्ञानदेव घाडी तृतीय क्रमांक, लकी ड्रॉ पैठणी यांनी पटकावली . श्री गणेश कला क्रीडा मंडळाच्या मान्यवरांच्या हस्ते या सर्वांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास गोलतकर यांनी केले. सतत तीन दिवस चाललेले हे गणेश जयंती कार्यक्रम मंडळाचे अध्यक्ष विलास गांवकर व मंडळाचे सर्व सदस्य यांच्या अथक प्रयत्नातून अतिशय सुरेख पध्दतीने राबवण्यात आला.

You cannot copy content of this page