मराठी शाळेत इंग्रजी शिकविण्याचे उपक्रम राबवा-पुष्कराज कोले
⚡वेंगुर्ला ता.०६-: मराठी माध्यमाच्या शाळांमधून शिकून विविध क्षेत्रात अतुलनिय कामगिरी करणा-यांची अनेक उदाहरणे आहेत. तरीही मराठी शाळांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकविण्याचे उपक्रम राबविल्यास मराठी माध्यमाच्या शाळांकडे पालकांचा ओढा नक्की वाढेल असे प्रतिपादन उद्योजक पुष्कराज कोले यांनी केले. सुमारे ११० वर्षांची परंपरा असलेल्या वेंगुर्ला येथील रा.कृ.पाटकर हायस्कूल व रा.सी.रेगे कनिष्ठ महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन तसेच पारितोषिक वितरण कार्यक्रम ३…
