१२ रोजी अंडरम क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

डी सालईवाडा यांचे आयोजन;विजेत्या संघास बारा हजार रुपयांचे बक्षीस

⚡सावंतवाडी ता.०६-: डी- सालईवाडा अंडरम क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेचं भव्य आयोजन १२ रोजी करण्यात आले आहे. या प्रीमियर लीगमध्ये एकूण दहा संघाने सहभाग घेतला असून पहिलं पारितोषिक 12 हजार रुपये, द्वितीय पारितोषिक 7 हजार रुपये ठेवण्यात आले आहे.

तसेच उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असे अनेक बक्षिसांची खैरात ठेवण्यात आली आहे. याबाबतची माहिती मंडळाच्या आयोजकांकडून देण्यात आली आहे.

तरी या स्पर्धेचा क्रिकेट रसिकांनी लाभ घ्यावा असे आव्हाने मंडळातर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page