शॉर्टसर्किटने आग लागून आंबा, काजू बागेचे दोन लाखांचे नुकसान
इन्सुली गावकरवाडी येथील घटना बांदा ता.इन्सुली गावकरवाडी येथील तिलारी कॅनलबाजूला असणाऱ्या आंबा, काजू बागायतीला महावितरणच्या पोलवर झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून दीड ते दोन लाखांच नुकसान झाल आहे. आज दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली आहे. शेजारी राहणाऱ्या ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत ही आग आटोक्यात आणल्यान अनर्थ टळला. अन्यथा मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले असते. दरम्यान, महावितरण…
