पौष्टिक तृणधान्याच्या क्षेत्र विस्तारासाठी कृषी विभाग शेतकऱ्यांच्या सोबत..

वृषाली मुळे;हुंबरट येथे पाककला स्पर्धा व शेतकरी मेळावा

⚡कणकवली ता.१३-: आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 व स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सवा निमित्त पाककला स्पर्धा व शेतकरी मेळावा तालुका कृषी अधिकारी कार्यालय कणकवली व ग्रामपंचायत हुंबरट याच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आली.
यासाठी तालुका कृषी अधिकारी कणकवली सौ. वृषाली मुळे , मंडळ कृषी अधिकारी शांतीनाथ पवार , कृषी पर्यवेक्षक राजन सावंत, सौ. वैष्णवी ठाकूर , सरपंच श्रीम. मनीषा गुरव , स्नेहा सिंधू कृषि पदवीधर संघचे अध्यक्ष हेमंत सावंत, श्री सावंत, श्री .राणे तसेच उपसरपंच संदीप होळकर, ग्रामसेवक वैभव ठाकूर, तलाठी सौ. योजना सापळे , आरोग्य विभागाचे कर्मचारी सौ. डॉ.दीक्षा वाघमारे, सौ.योगीता गोसावी आरोग्य सेविका सौ.प्रियांका पांचाळ व प्रिया पांचाळ ,(आशा सेविका),कृषी सहाय्यक विशाखा रावराणे, कृषी सेवक राहुल कोलवते उपस्थित होते.
स्नेह सिंधू कृषि पदवीधर संघटनेचे अध्यक्ष हेमंत सावंत, कृषी पर्यवेक्षक ठाकूर यांनी पौष्टिक तृणधान्याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कृषी पर्यवेक्षक वैष्णवी ठाकूर यांनी शेतकऱ्यांना व महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच पाककला स्पर्धेमध्ये पौष्टिक तृणधान्य पासून तयार करण्यात आलेल्या विविध पदार्थांचे परीक्षण करून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक सौ. संचीता सत्यवान पाडावे, विशाखा चंद्रकांत गुरव, नितिका नितिन बागवे अशा प्रकारे देण्यात आले. तालुका कृषी अधिकारी कणकवली यांनी भाषणामध्ये पौष्टिक तृणधान्य महत्त्व खास करुन सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी नागलीचे रोजच्या आहारातील महत्त्व, गरज या विषयी मार्गदर्शन केले. पौष्टिक तृणधान्याच्या क्षेत्र विस्तारासाठी व प्रचार प्रसिद्धीसाठी कृषी विभागाच्या ब्रीदवाक्यनुसार शेतकऱ्याच्या सेवार्थ कृषी विभाग शेतकऱ्यांच्या सोबत आहे. अशाप्रकारे केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव ठाकूर, प्रास्ताविक राहुल कोलवते व आभार राजन सावंत यांनी मानले.

You cannot copy content of this page