आम्ही भारतीय मंचाच्या वतीने 19 फेब्रुवारीला शिवजयंती…

एॅड.. संदीप निंबाळकर यांची माहिती ; सर्वधर्मसमभाव जपण्याचा उद्देश..

⚡सावंतवाडी ता.१३-: आम्ही भारतीय मंच आणि श्रीराम वाचन मंदिराच्या वतीने सर्वधर्मसमभाव जपण्यासाठी प्रथमच 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार लोकांसमोर पोहोचावेत हा यामागचा मुख्य उद्देश आहे असे माहिती ऍड. संदीप निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी श्रीराम वाचन मंदिर चे उपकार्याध्यक्ष डाॅ. जी ए बुवा, कार्यवाह रमेश बोंद्रे,वंचित चे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, फादर अमित डिप्लॅटो, मुस्लिम वेल्फेअरचे उपाध्यक्ष रफिक मेनन, राष्ट्रवादीचे शफिक खान उपस्थित होते.

ऍड निंबाळकर म्हणाले, आम्ही भारतीय मंचाच्यावतीने यापूर्वी विविध सण एकत्र येऊन करत होतो मात्र यापुढे योग पुरुषांची जयंती करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे ची सुरुवात 19 फेब्रुवारी पासून शिवजयंती ने करणार आहोत. योग्य पुरुष हे विविध जाती धर्मात वाटले गेले होते मात्र त्यांनी केलेले काम हे केवळ मानव कल्याणासाठीच होते ते कुठल्या एका जातीसाठी नव्हते त्यामुळे सर्वधर्मसमभाव जोपासण्याबरोबरच खरे छत्रपती शिवाजी महाराज काय होते हे लोकांना समजण्यासाठीच आम्ही शिवजयंती साजरी करणार आहोत.
डॉ.जी ए बुवा म्हणाले, सर्वधर्मसमभाव समाजासमोर जावा यासाठीच शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे छत्रपती शिवरायांचे विचार यानिमित्ताने आम्ही सर्वांसमोर पोहोचवणार आहोत. यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित मराठी इंग्रजी पुस्तकांचे प्रदर्शनही वाचन मंदिर मध्ये भरवणार आहोत. ज्या लोकांकडे शिवाजी महाराजांवर आधारित जुनी पुस्तके असतील त्यांनी ही पुस्तके या प्रदर्शनामध्ये सादर करावी ही पुस्तके वाचन मंदिर कडून पुनश्च त्यांच्याकडे पोचवण्याची जबाबदारी घेतली जाईल.
दरम्यान राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या मृत्यूप्रकरणी निषेधार्थ आम्ही भारतीय मंचाच्या वतीने ओरस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर येथे 17 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी एक वाजेपर्यंत तोंडाला काळी पट्टी बांधून मुक आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनाला जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने पाठिंबा दर्शविण्यात आला असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

You cannot copy content of this page