चिवला बीच बंधाऱ्यावरील रस्ता दुरुस्ती कामाचा शुभारंभ
मालवण (प्रतिनिधी) मालवण शहरातील चिवला बीच येथे पर्यटक आणि नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या चिवला बीच निलरत्न बंगला ते धुरीवाडा कुरण पर्यंत अस्तित्वातील रस्ता दुरुस्त करणे या कामाचा शुभारंभ आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तर २०२५-…
