समाजसेवा आणि विकासाचा वारसा पुढे नेणार …

प्रमोद कामत; पंचायत समितीतही महायुतीचा विजय निश्चित असल्याचा व्यक्त केला विश्वास…

⚡बांदा ता.२५-: बांदा जिल्हा परिषदेतून अनेकजण इच्छुक असताना मला संधी देत अनेकांनी पक्षासाठी त्याग केला. तसेच सुशांत पांगम यांनीही आपली उमेदवारी मागे घेतली. माझ्या समाजसेवेला बांदा जिल्हा परिषदेतील मतदारांनी दिलेली ही साथ असून मला बिनविरोध निवडून आणण्याऱ्या प्रत्येकाचा मी ऋणी असून सर्वांना सोबत घेऊन माझी समाजसेवा अन् पंचक्रोशीचा विकास करण्यासाठी सदैव तत्पर राहीन असं मत बिनविरोध जिल्हा परिषद सदस्य तथा माजी सभापती प्रमोद कामत यांनी व्यक्त केले. बांदा येथे आज महायुतीच्या जिल्हा परिषद व‌ पंचायत समितीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

श्री. कामत पुढे म्हणाले, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली आपण कार्यरत राहणार आहे. लोकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी ऋणी असून ४० वर्षांपासून सुरू असलेली समाजसेवा अशीच कायम ठेवणार. तसेच पंचायत समितीत देखील महायुतीचा विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर म्हणाल्या, महायुतीच्या दोन्ही उमेदवारांचा विजय हा निश्चितच आहे. प्रमोद कामत बिनविरोध निवडून आले असून महायुतीच्या पंचायत समितीच्या उमेदवार रूपाली शिरसाट देखील विजयी होतील. हा विजय महायुतीचा असून केंद्र व राज्यातील सरकारचा फायदा गावाला होणार आहे. महिला जिल्हाध्यक्षा म्हणून त्या पदाला मी न्याय देण्याच काम केल आहे. नेत्यांचा माध्यमातून येणाऱ्या विकासनिधीच्या जोरावर महायुती म्हणून आम्ही विजय संपादन करू असा विश्वास व्यक्त केला.‌ तर, गेली 20 वर्ष पक्षाचं काम करत असून महायुतीच्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महायुतीन बांद्यात चांगलं काम केलं असून ग्रामपंचायत सदस्य म्हणून केलेल्या माझ्या कामास लोक पसंती देतील. त्यामुळे पंचायत समितीत माझाही विजय होईल असा विश्वास उमेदवार सौ. रूपाली शिरसाट यांनी व्यक्त केला.

बांद्यात महायुतीच्या पंचायत समितीच्या उमेदवार रूपाली शिरसाट यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला असून जिल्हा परिषदेवर बिनविरोध निवडून आलेल्या माजी सभापती प्रमोद कामत यांनी देवतांचे आशीर्वाद घेतले. बांदेश्ववर मंदीर व ग्रामदैवत भूमिका देवीच दर्शन घेत आशीर्वाद घेतले. यानंतर घरोघरी जाऊन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी यावेळी भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, जिल्हा परिषद बिनविरोध सदस्य, माजी सभापती प्रमोद कामत, भाजपच्या पंचायत समिती उमेदवार रूपाली शिरसाट, माजी सभापती शितल राऊळ, उपसरपंच आबा धारगळकर, जावेद खतिब, तोरसे माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश सावळ, शिवसेना विभागप्रमुख भैय्या गोवेकर, बांदा माजी सरपंच अशोक सावंत, दीपक सावंत, डिंगणे सरपंच संजय डिंगणेकर, माजी सरपंच जयेश सावंत, देवस्थान समिती अध्यक्ष बाळू सावंत, बांदा शहराध्यक्षा बाबा काणेकर, माजी सदस्य हुसेन मकानदार, दादू कविटकर, रत्नाकर आगलावे, शैलेश केसरकर, निलेश देसाई, सिद्धेश महाजन, अक्षय मयेकर, साई सावंत, सुनिल धामापुरकर, सुधीर शिरसाट, प्रवीण नाटेकर, संदीप बांदेकर, गुरूदत्त कल्याणकर, केदार कणबर्गी, दर्पण आळवे, मनोज कल्याणकर, निलेश कदम, राजेश विर्नोडकर, भाऊ वाळके, श्रीधर सावंत, बाळा आकेरकर, कैलास गवस, उदय एडवे, समीर सावंत, सौ. पेडणेकर, सत्यनारायण गवस आदींसह भाजप, शिवसेना महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page