Headlines

Global Maharashtra Breaking News

वेंगुर्ले पिराचा दर्गा येथे मोठे आंब्याचे जुने झाड कोसळले…

सुदैवाने मोठा अनर्थ टळला ⚡वेंगुर्ले ता.२५-: वेंगुर्ले तालुक्यात गेले दोन दिवसा पासून पाऊस सुरू झाला असून आज सकाळी ८:३० च्या सुमारास वेंगुर्ला शहरातील पिराचा दर्गा येथे भले मोठे जुने आंब्याचे झाड विजेच्या खांबासह तारा तोडत रस्त्यावर कोसळले. यामुळे या मार्गावर काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली. तर येथील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली.मात्र वीज वितरण चे मोठे नुकसान…

Read More

एतिहासिक साई मठाला तामिळनाडूतील भक्तांनी दिली भेट

बांदा/प्रतिनिधीबांदा शहरातील साईभक्त (कै.) बाप्पा केसरकर संस्थापीत साईमठातील प्रत्यक्ष १०४ वर्षापूर्वी श्री साईबाबांनी दिलेल्या ऐतीहासीक साई तसबीरीचे दर्शन तामीळनाडुतील साईभक्तानी बांद्यात येवून घेतले.दिपक राजा, धाना शेकर हे दोन साई भक्त तामीळनाडू राज्यातील असून सध्या बाबांच्या सेवेत शिर्डीत राहत आहेत. श्री साई सतचरीत्रात उल्लेख असलेल्या सर्व साईभक्ताचा व त्यांच्या सर्व गोष्टीचा अभ्यास त्याच्या पिढीकडुन जाणुन घेवून…

Read More

बांदा येथील साई मठाला राम खाटपे यांनी दिली भेट

बांदा/प्रतिनिधीमुंबईची प्रसिध्द मानाची पालखी साईलीला मंडळ लालबाग या मंडळाचे अध्यक्ष राम खाटपे यांनी बांदा शहरातील (कै.) बाप्पा केसरकर संस्थापीत साईमठास भेट देऊन ऐतीहासीक साई तसबीरीचा इतीहास जाणुन घेतला.यावेळी त्यांच्यासोबत प्रदीप साळुंखे, सुधाकर घाडी, संदीप चव्हाण, खोटले श्री स्वामी समर्थ मठाचे मठाधीष गणेश घाडीगावकर आदी उपस्थित होते. यावेळी राम खाडपे याना श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाच्या…

Read More

जुनाट वृक्षाची फांदी पडली घरावर

सुदैवाने जीवितहानी नाही: पानवळ येथील घटना बांदा/प्रतिनिधीमुसळधार पावसामुळे बांदा पानवळ येथील ग्रामपंचायत कर्मचारी तुळशीदास महादेव किनळेकर यांच्या राहत्या घराच्या नजिक जुनाट वृक्षाची फांदी कोसळून नुकसान झाले. मात्र सुदैवाने किनळेकर कुटुंबीय यातून बचावले.ही घटना आज सकाळी घडली. सरपंच प्रियांका नाईक, तलाठी वर्षा नाडकर्णी, ग्रामपंचायत सदस्य बाळु सावंत यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत नुकसानीची पाहणी केली.

Read More

पालकमंत्री रविंद्र चव्हाण उद्या जिल्हा दौऱ्यावर…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२५-: सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि. 26 जून 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

Read More

व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम प्रशालेची वर्षाची पालक सभा मोठ्या उत्साहात संपन्न…

⚡बांदा ता.२५-: येथील व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम प्रशालेची चालू शैक्षणिक वर्षाची पालक सभा मोठ्या उत्साहात पार पडली.पालक सभेची सुरवात दीप प्रज्वलनाने झाली. दहावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच अभ्यासक्रमातील विविध विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष मंगेश कामत, सुधाकर डेगवेकर, श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सभेचे औचित्य साधून शिक्षक पालक…

Read More

बांदा कट्टा सर्कल येथे कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी नेमा…

रियाज खान; बांदा पोलीस निरीक्षकांकडे निवेदनद्वारे मागणी बांदा/प्रतिनिधी-:बांदा कट्टा सर्कल येथे शिवसेना अल्पसंख्याक तालुकाप्रमुख रियाज खान यांनी बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामराव काळे यांना कट्टा कॉर्नर येथे कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी नेमण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. झाराप पत्रादेवी महामार्गावर बांदा कट्टा कार्नर सर्कल जवळ वारंवार अपघाताच्या घटना वाढत आहेत. या सर्कल ठिकाणी सहा रस्ते जोडले गेल्यामुळे…

Read More

कणकवली येथे 27 रोजी आपत्ती व्यवस्थापन समितीची सभा

तक्रारी अथवा सूचना बैठकीत मांडा; आम.नितेश राणे यांचे आवाहन ⚡कणकवली ता.२५-:कणकवली, देवगड व वैभववाडी या तीनही तालुक्यांच्या आपत्ती व्यवस्थापन समितीची सभा उपविभागीय अधिकारी जगदिश कातकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार 27 जून 2023 रोजी दुपारी 1 वाजता तहसीलदार कार्यालय कणकवली येथे आयोजित केली आहे.आपत्ती व्यवस्थापन बाबत जनतेच्या काही तक्रारी अथवा सूचना असल्यास 27 जून रोजीची बैठकीत मांडाव्यात…

Read More

आरपीडी हायस्कूलच्या गरजू व गरीब मुलींना गणवेश वाटप

हायस्कूलच्या १९९३-९४ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्यावतीने राबविण्यात आला उपक्रम* ⚡सावंतवाडी ता.२५-: येथील आरपीडी हायस्कूलच्या १९९३-९४ बॅचच्या माजी विद्यार्थी आणि मुंबई येथील आंबेडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक दीपक गावडे आणि त्यांचे शालेय जीवनातील सहकारी सुनील नाईक, संजय सावंत, सुरेश गवस यांच्यावतीने आरपीडी हायस्कूलच्या गरजू व गरीब मुलींना गणवेश वाटप करण्यात आले. गणवेश वाटपाचा हा कार्यक्रम १९९३-९४ बॅचच्या माजी विद्यार्थी…

Read More

बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूलला ज्युनियर कॉलेजची मान्यता

⚡कणकवली ता.२५-:अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेचे बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूल कणकवलीला जुनियर कॉलेजचे मान्यता मिळाली असून, कॉलेज साठी इयत्ता 11 वी आणि 12 वी साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. संगीत, नृत्य, तायक्वांदो, तबला या कलांसाठी ही शाळा गेली 22 वर्षे मार्गदर्शन करत आहे . इयत्ता 11 वी आणि 12 वी कला, वाणिज्य, विज्ञान या…

Read More
You cannot copy content of this page