⚡कुडाळ ता.०८-: जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वेताळ बांबर्डे देऊळवाडी येथे रानभाज्या प्रदर्शन संपन्न झाले. या प्रदर्शनातून “पालेभाज्या घ्या मुखी, आरोग्य ठेवा सुखी” हा संदेश देण्यात आला. या प्रदर्शनात रानभाज्यांचे विविध प्रकार, त्यांचे आपल्या शरीरासाठी असणारे फायदे हे विद्यार्थी वर्गाला समजविण्यात आले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा विद्या बांबर्डेकर, ग्रामपंचायत सदस्या तिवरेकर, शिक्षकवृंद, विद्यार्थी वर्गाचे पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते. एक पानाची भाजी, अंबाडी, शेवगा, टाकळा, अळू, कणगी, ओवा, अळंबी, सुरण, भारंगी, मोहरी, कुरड, काटला फागला या रानभाज्या या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या.
