प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी : अपघाताची शक्यता
⚡बांदा ता.०८-: पाडलोस मडुरा मार्गावरील सुधीर गावडे यांच्या मांगराच्या विरुद्ध बाजूने रस्त्याला खेटून एका कंपनीने खड्डा खोदून त्यावर झाकण घातले आहे. परंतु खड्डा सखल असल्याने वाहन बाजूस गेल्यास अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे तात्काळ लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी पाडलोस ग्रामस्थांमधून होत आहे.
बांदा-शिरोडा मार्गावरील पाडलोस येथे बांद्याच्या दिशेने डाव्या बाजूला रस्त्याला खेटून एका कंपनीने खड्डा खोदला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने त्यावर झाकण घातले परंतु खड्डा सखल असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. दोन वाहनांना बाजू देताना वाहन रस्त्याबाहेर गेल्यास हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित कंपनीने याकडे तात्काळ लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी पाडलोस ग्रामस्थांमधून होत आहे.
