माठेवाडा मदारी रोड येथील गटाराचे काम करा…

अँड. राबिया शेख आगा: मुख्याधिकारी यांच विविध समस्यांबाबत निवेदनद्वारे वेदले लक्ष.

सावंतवाडी ता.०८-: येथील शहरातील माठेवाडा मदारी रोड वरील मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते तसेच एक प्रसुती रुग्णालय असल्याने तिथून रुग्णांचे नातेवाईकांची य-जा देखील मोठ्या प्रमाणात होत असते सदर भागातील गटार शेजारी रस्ता खचला असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे, तसेच गटारात अडकलेल्या कचरा न काढल्यामुळे गटाराचे पाणी रस्त्यावर वाहत आहे. तसेच रस्त्याच्या कडेला झाडी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहेत तरी या समस्या तातडीने गणेश चतुर्थी पूर्वी सोडवण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी महिला शहर अध्यक्ष अँड सौ. राबिया शेख आगा यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदन असे नमूद करण्यात आले की माठेवाडा मदारी रोड येथे उपरकर शूटिंग रेंन्जकडे जाणाऱ्या मार्गावरील नाल्याचे स्लॅब कोसळला आहे तसेच पुढच्या महिन्यात गणेश चतुर्थी असल्याने या मार्गावरून गणेश चतुर्थीच्या मूर्ती रहिवासांना ज्ञान करण्यासाठी सोयीस्कर होण्यासाठी आपण त्वरित यावर उपाययोजना करावी जेणेकरून या सर्व समस्या गणेश चतुर्थी पूर्वी सोडून द्यावे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी निवेदन द्वारे केली आहे.

यावेळी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर ,बावतीस फर्नांडिस, काशिनाथ दुभाषी, राकेश नेवगी, इफ्तिकार राजगुरू, मारिता फर्नांडिस ,अल्पसंख्यांक महिला शहराध्यक्ष एडवोकेट सौ राबिया शेख-आगा, तौसीफ आगा,आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page