दीपक केसरकर मित्रमंडळ व मराठी अध्यापक संघातर्फे सावंतवाडीत कार्यक्रम..
⚡सावंतवाडी ता.०८-:* येथील दीपक केसरकर मित्र मंडळ व सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अद्याप संघ यांच्या वतीने
व बारावी परीक्षा उज्वल यश प्राप्त केलेल्या प्रत्येक शाळेतील तीन विद्यार्थ्यांचा व शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्याप्रमाणे मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना मराठी विषयात 98 व 99 गुण प्राप्त झाले आहेत त्याही विद्यार्थ्यांचा गौरव क्रांती दिनाच्या औचित्य साधून बुधवारी दि.9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता सावंतवाडी येथे काझी शहाबुद्दीन हॉलमध्ये आयोजित करण्यात आले. याबाबतची माहिती केसरकर मित्र मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.
दरम्यान विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊ मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे त्याप्रमाणे ज्या शाळांचे निकाल 2023 मध्ये शंभर टक्के लागले आहेत त्या मुख्याध्यापकांचा सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन गौरव केला जाईल तसेच सामाजिक शैक्षणिक कृषी व क्षेत्रातील उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींचा सन्मान शाल श्रीफळ देऊन केला जाणार आहे तरी सर्वांनी उपस्थित राहून सहकार्य करावे असे आव्हान देखील केसरकर मित्र मंडळ व सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अध्यक्ष संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
