तुटलेल्या विद्युतभारित वाहिनीचा शॉक लागून बैल ठार
मळगाव येथील घटना: सुदैवाने शेतकरी बचावला ⚡सावंतवाडी ता.०६-: मळगाव कुंभारवाडी येथे शेतात गुरांना चारायला नेले असताना तुटलेल्या विद्युतभारित वाहिनीचा शॉक लागून बैल जागीच ठार झाला. ही घटना आज सकाळी सातच्या सुमारास घडली. न्हानू दशरथ खडपकर (रा. कुंभारवाडी) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. बैल तडफडत असलेला पाहून त्याच्या दिशेने धावत जाताना तुटलेली विद्युत वाहिनी पाहून बाजूला…
