प्रशिक्षण शिबिराच्या प्रमाणपत्रांचे महिलांना वाटप

बांदा/प्रतिनिधी
महाराष्ट्र व्यवसाय प्रशिक्षण मंडळ व बांदा शहर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने १५ व्या वित्त आयोगातून महिलांसाठी घेण्यात आलेल्या शिवणकाम, फॅशन डिझायनिंग, पर्यावरणपूरक कापडी पिशव्या व मसाले तयार करणे शिबिरातील सहभागी महिलांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
बांदा शहरातील बहुसंख्य महिलांनी हे प्रशिक्षण शिबीर पूर्ण करून स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे. यावेळी सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब, ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, प्रशांत बांदेकर, रत्नाकर आगलावे, रुपाली शिरसाट, रेश्मा सावंत, शिल्पा परब, रिया येडवे, श्रेया केसरकर, तनुजा वराडकर, देवल येडवे, दिपलक्ष्मी पटेकर-सावंत, ग्रामविस्तार अधिकारी लीला मोर्ये आदी उपस्थित होते.
यावेळी प्रशिक्षण शिबिरात सहभागी होऊन प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिलांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

You cannot copy content of this page