Headlines

Global Maharashtra Breaking News

कबुलायतदार अध्यादेशात असंख्य त्रुटी

आज ग्रामसभेत होणार चर्चा:शासनाला कळविणार अपेक्षित बदल.. आंबोली,ता.८ : अनिल चव्हाण : सरकारने मोठा गाजावाजा करून आंबोली कबुलायतदार गावकर जमीन प्रश्न सुटल्याची शेखी मिरवली मात्र यात अनेक त्रुटी असल्याचे सरकारी जीआर(अद्यादेश) आल्यानंतर स्पष्ट झाले आहे.त्यावर आज ग्रामसभेत चर्चा करून शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. * शासनाने स्थानिकांचे मत ग्रामसभा ठराव विचारातच घेतलेला नाही.इंडिया इज पोलीस स्टेट…

Read More

डास निर्मुलन फवारणी करा…

अन्यथा उपोषण:महेश पांचाळ यांच्या पालिका प्रशासनाला इशारा.. ⚡सावंतवाडी ता.०८-: पावसाळ्याचे दोन महिने उलटूनही आपल्या नगरपरिषद प्रशासनाकडून डास निमुर्लन फवारणी झालेली नाही. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून मोठया प्रमाणात नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच डेंग्यू, मलेरीया यासारखे साथीचे आजार सावंतवाडी शहरात पसरले आहेत.त्यामुळे निर्मुलन फवारणी त्वरित करावी आशी मागणी भाजपचे माजी तालुका सरचिटणीस महेश पांचाळ…

Read More

समुद्रातील कृत्रिम रीफ (भित्तीका) विषयी १० व ११ रोजी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

⚡मालवण ता.०८-: केंद्र शासनाने कृत्रिम रिफ व सागरी संचयनाद्वारे किनारी मत्स्यव्यवसाय पुन्हा निर्माण करण्याकरीता प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजने अंतर्गत (PMMSY) “कृत्रिम रिफ व सागरी संचयनामार्फत शाश्वत मत्स्यव्यवसाय व उपजीविकेस प्रोत्साहन या नवीन घटकाचा समावेश केला आहे. या योजनेअंतर्गत कृत्रिम रिफ म्हणजेच कृत्रिम भित्तीका विषयी माहिती, त्याचे महत्व तसेच संगोपन विषयी किनारपट्टीवरील गावातील मच्छिमार बांधवांसाठी जनजागृती कार्यक्रम…

Read More

मालवण मधील तेली समाजाच्या विद्यार्थ्यांना आवाहन

⚡मालवण ता.०८-: मालवण मधील तेली समाजाच्या २०२२- २०२३ या शैक्षणिक वर्षातील दहावी (७५%), बारावी (७०%) उत्तीर्ण तसेच पदविका मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे. त्यासाठी या विद्यार्थ्यांनी आपली गुणपत्रिका व आधारकार्ड झेरॉक्स सेल्फ अटेस्टेड करून तसेच मागील बाजूस पालकांचे नाव व पत्ता, मोबाईल क्रमांक लिहून तेली समाज मालवणचे सचिव मंगेश विठ्ठल शेर्लेकर, घर नं. ११६२,…

Read More

उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती संध्या गावडे यांचे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे स्वागत…

⚡सिंधुदुर्ग-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी पदाचा पदभार श्रीमती संध्या गावडे यांनी नुकताच स्विकारला असून आज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,सिंधुदुर्ग यांच्यावतीने पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार श्री आबा खवणेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करुन त्यांच्या पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या. श्रीम संध्या गावडे यांनी यापूर्वी जिल्हा मुख्यालयात जिल्हा पोलिस अधीक्षक…

Read More

गटारांवर झाकण बसविण्यात न आल्याने वाहतुकीची कोंडी…

तात्काळ झाकण बसवा;राष्ट्रवादीच्या हिदायतुल्ला खान यांची मागणी सावंतवाडी ता.०८-:येथील सालईवाडा परिसरात गटारावर झाकणं घालून घेण्यात यावी, अशी मागणी महिनाभरापूर्वी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. परंतु अद्याप देखील नगरपालिका प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे दर मंगळवारी आठवडा बाजाराला येणाऱ्या नागरिकांना ट्राफिकच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्वरित याची नगर परिषदेने दखल घेऊन या गटारांवर झाकण…

Read More

सैनिक बहिणींसाठी विद्यार्थ्यांनी राखी पाठवावी

तहसीलदार वर्षा झाल्टे यांचे आवाहन मालवण (प्रतिनिधी) देशाच्या सीमेवर जीवाची बाजी लावून देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रक्षाबंधन निमित्त सैनिकांना राख्या पाठविणे हा स्तुत्य उपक्रम आहे. आज पुरुषांबरोबर महिलाही लष्करी सेवेत असून देशाचे रक्षण करत आहेत. त्यामुळे विद्यार्थिनींबरोबरच विद्यार्थ्यांनीही सीमेवरील आपल्या सैनिक बहिणींसाठी राखी पाठवावी. सैनिक देशासाठी लढत असले तरीही देशातील नागरिकांनीही सैनिकांप्रमाणे…

Read More

अखेर जिओचे नेटवर्क पुन्हा चालू

सिद्धेश तेंडोलकर यांच्या प्रयत्नांना यश ⚡सावंतवाडी ता.०८-: मळगाव गावात गेले 5-6 दिवस जिओ नेटवर्क गायब होते याबाबत सिद्धेश तेंडोलकर राष्ट्रवादी ओबीसी सेल तालुकाध्यक्ष यांनी जिओच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. आज पर्यंत पुन्हा नेटवर्क सुरळीत करण्याचे काम करून देतो असे संबंधित अधिकारी यांनी सांगितले होते. आजपासून जीओचे नेटवर्क चालू झाल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केलं आहे.

Read More

वाफोली येथील नळ पाणी योजनेच्या पंपाची केबल चोरीस

घटना सकाळी उघडकीस:केबल कटरने कापून रात्री नेल्याचा संशय.. बांदा/प्रतिनिधी वाफोली येथील जीवनदायिनी म्हणून ओळखली जाणारी नळ पाणी पुरवठा योजना असून चालू पंपाची केबल चोरीला गेल्याची घटना घडली आहे.ग्रामपंचायत कर्मचारी संदीप धुरी हे सकाळी पंप सुरू करण्यासाठी गेले असता पंपाची केबलच गायब असल्याची त्यांच्या निदर्शनास आली. ही केबल बहुतेक कटरच्या साहाय्याने कापून नेल्याचे धुरी यांचे म्हणणे…

Read More

युवराज लखमराजे भोसले यांचे भाजप महिला पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन

.⚡सावंतवाडी ता.०८-: येथील भाजपच्या युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी संस्थांचे युवराज लखमराजे भोसले यांची निवड झाल्याबद्दल आज सावंतवाडी शहर महिला भाजप तर्फे मोहिनी मडगावकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत आज त्यांच्या निवासस्थानी भेट अभिनंदन केले.तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी दिपाली भालेकर,उत्कर्षा सासोलकर,मेघना साळगावकर,ज्योती मुद्राळे,साक्षी गवस,नेहा काष्टे,सविता टोपले आदी उपस्थित होते.

Read More
You cannot copy content of this page