घटना सकाळी उघडकीस:केबल कटरने कापून रात्री नेल्याचा संशय..
बांदा/प्रतिनिधी
वाफोली येथील जीवनदायिनी म्हणून ओळखली जाणारी नळ पाणी पुरवठा योजना असून चालू पंपाची केबल चोरीला गेल्याची घटना घडली आहे.ग्रामपंचायत कर्मचारी संदीप धुरी हे सकाळी पंप सुरू करण्यासाठी गेले असता पंपाची केबलच गायब असल्याची त्यांच्या निदर्शनास आली.
ही केबल बहुतेक कटरच्या साहाय्याने कापून नेल्याचे धुरी यांचे म्हणणे आहे.यावेळी धुरी यांनी लागलीच वाफोली सरपंच व उपसरपंच यांना या घटनेची माहिती दिली. अंधाराचा फायदा घेऊन अज्ञाताने चोरी केली असावी असे स्थानिकांचे म्हणणे आहे.चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून घर,मंदिरतील पेट्या लंपास केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. आतातर चोरांनी पंपाची केबलच लक्ष केल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत. पोलिसांनी रात्रीच्या वेळी बांदा ते वाफोली दरम्यान गस्त घालण्याची आवश्यकता आहे असे मत वाफोली ग्रामस्थांनी वेक्त केले आहे.
